शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : दोन मृतदेह आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पाथरी/बोरी ( परभणी ) : पाथरी तालुक्यातील वरखेड आणि जिंतूर तालुक्यातील कोक येथील प्रत्येकी एका व्यक्तीचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी/बोरी (परभणी) : पाथरी तालुक्यातील वरखेड आणि जिंतूर तालुक्यातील कोक येथील प्रत्येकी एका व्यक्तीचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.जिंतूर तालुक्यातील कोक येथील रहिवासी राजू साळुंके (४०) या तरुणाचा मृतदेह परभणी- जिंतूर रस्त्यालगत ऋत्विक कन्स्ट्रक्शन समोरील गोविंदराव कंठाळे यांच्या शेतामध्ये शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास आढळून आला. मयत तरुणाच्या अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे दिसून येत असल्याने याबाबतची माहिती सदर शेतकऱ्याने बोरी पोलिसांना दिली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी परदेसी, सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, जमादार व्ही.एम.गिरी, के.जी. पतंगे, बी.डी. शिंदे, ज्ञानेश्वर चोपडे, एस.पी.सानप, पोकॉ.सुनील कटारे यांनी घटनास्थळास भेट दिली. त्यानंतर पंचनामा करण्यात आला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. तपासामध्ये मयत हा कोक येथील राजू साळुंके असल्याचे स्पष्ट झाले. तो बोरी येथील एका धाब्यावर वेटर म्हणून काम करीत होता. तसेच तो गेल्या दोन - तीन दिवसांपासून घरी गेला नसल्याचे चौकशीत समजले. या प्रकरणी बोरी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.कुजलेला मृतदेह आढळला४पाथरी तालुक्यातील वरखेड येथील शेतकरी बळीराम देविदास तोंडे यांच्या शेतात ९ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शंकर जयवंत फासाटे (६८ रा.डोंगरगाव) यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.याबाबतची माहिती पाथरी पोलिसांना दिल्यानंतर पोलीस निरीक्षक डी.डी.शिंदे, सपोनि.पवार, पोलीस नाईक माने, भारती आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.४मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी परिसरातील गावांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर मयत व्यक्ती शंकर फासाटे असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहाचे पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.४मयत शंकर फासाटे यांची मानसिक स्थिती बरी नव्हती. त्यामुळे ३० एप्रिल रोजी ते घरातून निघून गेले होते. नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला; परंतु, ते आढळून आले नाहीत. पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली.

टॅग्स :parabhaniपरभणीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस