शहरं
Join us  
Trending Stories
1
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
2
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
3
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
4
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय
5
“पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो”; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवार स्पष्टच बोलले
6
Life lesson: भूतकाळात झालेल्या चुकांचे ओझे वर्तमानात घेऊन वावरू नका; करा 'हा' उपाय!
7
Rules Changed From 1st June 2024: १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससह बदलले 'हे' नियम, SBI च्या ग्राहकांसाठीही मोठी अपडेट
8
इंडिगोच्या विमानात पुन्हा बॉम्बची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
9
आम्ही जरांगे: दमदार भूमिकेत अजय पूरकर; साकारणार अण्णासाहेब पाटील यांची भूमिका
10
मलायका-अर्जुनचं खरंच ब्रेकअप झालं का? मॅनेजर म्हणते- "ते अजूनही..."
11
Tarot card: कोणतेही कारण असो, थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय; ही शिकवण देणारा आठवडा!
12
मुलाला, बापाला अन् बापाच्या बापालाही अटक करण्यात आलीय, जे दोषी असतील...; अजित दादा स्पष्टच बोलले
13
Apara Ekadashi 2024: अपरा एकादशीला सूर्याची उपासना करा; अकाली मृत्यूची भीती घालवा; वाचा शास्त्र!
14
'लगान' नाही तर 'या' सिनेमाच्या सेटवर सुरू झाली होती किरण राव आणि आमिर खानची लव्हस्टोरी
15
“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह
16
पश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी बॉम्बफेक; सीपीएम, आयएसएफचे कार्यकर्ते जखमी, ईव्हीएमही पाण्यात फेकले  
17
“PM मोदींची ध्यानसाधना देशाला लाभदायक, दुराचारी लोकांना त्याचे महत्त्व नाही”: योगी आदित्यनाथ
18
अजित पवारांची सभा घेतली, राष्ट्रवादीच्या महिला उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल
19
अग्रलेख: डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अडचणीत! लाच दिल्याप्रकरणी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी
20
मतदानाच्या सप्तपदीतील शेवटची फेरी आज; ८ राज्यांत ५७ जागांवर दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

परभणी : टेम्पोला वाचविताना टिप्पर चढला दुभाजकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 12:55 AM

शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सोनपेठ फाटा ते पोखर्णी फाट्यापर्यंत टाकण्यात आलेल्या दुभाजकांमध्ये आऊटसोर्स नसल्याने शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणावर विरुद्ध दिशेने होत आहे. याचा फटका वाहनधारकांना बसत असून अपघातांमध्ये वाढ झाली आहे. ३ फेब्रुवारी रोजी विरुद्ध दिशेने येणाºया टेंपोला चुकविताना टिप्पर दुभाजकावर चढल्याची घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सोनपेठ फाटा ते पोखर्णी फाट्यापर्यंत टाकण्यात आलेल्या दुभाजकांमध्ये आऊटसोर्स नसल्याने शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणावर विरुद्ध दिशेने होत आहे. याचा फटका वाहनधारकांना बसत असून अपघातांमध्ये वाढ झाली आहे. ३ फेब्रुवारी रोजी विरुद्ध दिशेने येणाºया टेंपोला चुकविताना टिप्पर दुभाजकावर चढल्याची घटना घडली.राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पाथरी शहरातून जाणाºया या रस्त्यावर दुभाजक बसविण्यात आले आहेत. शहरात सोनपेठ पॉईंट, मोंढा परिसरात तसेच सेंट्रल नाका, बसस्थानक आणि सेलू कॉर्नर या ठिकाणी रस्त्यावर आऊटसोर्स सोडण्यात आले आहेत. बाहेरील व शहरातील रहदारी पूर्णत: याच रस्त्यावर अवलंबून आहे.या रस्त्यावरून येणाºया -जाणाºया दुचाकी आणि चारचाकी वाहनांना अनेक वेळा विरुद्ध दिशेने प्रवास करावा लागतो. यामुळे अपघाताचे प्रमाण आहे वाढले आहे. दुभाजकावर लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. या जाळ्या कापून काही ठिकाणी रस्ताही तयार करण्यात आला आहे. या रस्त्यावर दूर दूर यू-टर्न असल्याने वाहन चालक विरुद्ध दिशेने वाहने घेऊन जात असल्याने अपघात वाढले आहेत.३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास माजलगावकडून एम.एच. २३-६७२७ हा टिप्पर पाथरी शहरात येत होता. दरम्यान, याच वेळी मोंढा परिसरात विरुद्ध दिशेने वेगाने दुसरा टेंम्पो एम.एच. २०-९३३७ हा येत होता.समोरच्या टेम्पोला चुकविण्याच्या प्रयत्नात टिप्पर थेट दुभाजकावर चढला. यामुळे दुभाजकाच्या लोखंडी सळया तुटून पडल्या.या घटनेनंतर चालक टेम्पोसह पसार झाल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक आवेज काझी यांनी दिली. घटनेनंतर जखमी टिप्पर चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.वळण रस्ते तयार करा४पाथरी शहरातून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. शहर परिसरात या मार्गावर दुभाजकही टाकण्यात आले आहेत; परंतु, वाहनधारकांना वळण घेण्यासाठी मोठे अंतर कापावे लागत आहे. त्यामुळे बहुतांश वाहनधारक हे विरुद्ध दिशेने वाहन चालविण्यातच धन्यता मानत आहेत. परिणामी दररोज छोट्या-मोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन टाकण्यात आलेल्या दुभाजकामधून ठिकठिकाणी वळण रस्ते तयार करुन द्यावेत, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीAccidentअपघात