शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : कान्हेगाव येथे तलाठ्याला जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 00:23 IST

अवैध वाळू वाहतुकीच्या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २८ डिसेंबर रोजी घडली असून या प्रकरणी आरोपीविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपूर्णा (परभणी): अवैध वाळू वाहतुकीच्या अनुषंगाने कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २८ डिसेंबर रोजी घडली असून या प्रकरणी आरोपीविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.पूर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तहसीलदार पल्लवी टेमकर, तलाठी दीपक तुपसमुद्रे व त्यांचे सहकारी तालुक्यातील कान्हेगाव शिवारातील नदी घाटावर अवैैध वाळू उपसा थांबविण्यासाठी कारवाई करण्यास गेले होते. यावेळी पथकाला पाहताच वाळू उपसा करणारे आरोपी फरार झाले. त्यामुळे पथकातील अधिकारी, कर्मचारी आरोपींचा पाठलाग करीत असताना त्यातील एका आरोपीने तलाठी दीपक तुपसमुद्रे यांना दगड हातात घेऊन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.या प्रकरणी दीपक तुपसमुद्रे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी आनंद पंडितराव मोरे याच्याविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.शेळ्या चारण्यावरुन दाम्पत्यास मारहाण४गंगाखेड- शेळ्या चारण्याच्या कारणावरुन २९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास एका दाम्पत्यास मारहाण केल्याची घटना घडली असून दोघांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.पूर्णा तालुक्यातील वझूर येथील विजयमाला बाबुराव कचरे (४५) यांनी २८ डिसेंबर रोजी लक्ष्मण पवार यांच्या शेतात शेळ्या चारल्या. दरम्यान, २९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास संतोष मुंजाजी पवार, सतीश मुंजाजी पवार यांनी विजयमाला कचरे यांना शेतात शेळ्या चारण्याच्या कारणावरुन शिवीगाळ केली. तसेच सतीश पवार याने बाबुराव कचरे यांना मारहाणही केली. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दोन्ही भावांनाही मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार विजयमाला कचरे यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिली. त्यावरुन दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. जमादार हरिभाऊ शिंदे तपास करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी