शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : मसला गावाला टंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 00:15 IST

गोदावरी नदीकाठावरील मसला या गावाला सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. गोदावरी पात्रातून बेसुमार वाळू उपसा झाल्याने पात्र कोरडेठाक पडले असून, गावातील हातपंपांनाही पाणी राहिले नाही. परिणामी पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर ओढावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): गोदावरी नदीकाठावरील मसला या गावाला सद्यस्थितीत पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. गोदावरी पात्रातून बेसुमार वाळू उपसा झाल्याने पात्र कोरडेठाक पडले असून, गावातील हातपंपांनाही पाणी राहिले नाही. परिणामी पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर ओढावली आहे.गंगाखेड तालुक्यात यावर्र्षी टंचाईची दाहकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गोदावरी नदीपात्रात पाणीसाठा शिल्लक नाही आणि कोरड्या पडलेल्या नदीपात्रातूून वाळू मोठ्या प्रमाणात उपसा केली जात असल्याने पाण्याचे दूर्भिक्ष्य निर्माण झाले आहे.एकेकाळी सुजलाम, सुफलाम असलेल्या गोदावरी काठावरील गावांमध्ये यावर्षी मात्र पाण्यासाठी हंडा घेऊन फिरण्याची वेळ ओढावली आहे. तालुक्यातील मसला या गावातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने टंचाई वाढली आहे. विहिरी, हातपंपाला पाणी शिल्लक नाही. नळ योजना बंद पडली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.जनावरांची पाण्यासाठी भटकंतीच्मसला गावामध्ये पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांची धावपळ होत आहे. तर दुसऱ्या बाजूला गोदावरी पात्र कोरडे पडल्याने जनावरांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. तेव्हा जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी गोदावरी नदीपात्रात खड्डे करण्यास (झरे करण्यास) परवानगी द्यावी, अशी मागणी मसला येथील ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे केली आहे.च्सोमवारी ग्रामस्थांनी तहसीलदार स्वरुप कंकाळ यांची भेट घेतली. त्यांना गावातील पाण्याच्या परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर नदीपात्रात खड्डे खोदण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. यावेळी रामकिशन शिंदे, विनायक शिंदे, बाबासाहेब शिंदे, राजेभाऊ कदम, निवृत्ती शिंदे, अर्जून शिंदे, विशाल कदम, भागवत शिंदे, अरूण शिंदे, उद्धव शिंदे, राम शिंदे, गोविंद शिंदे, केशव भूजबळ आदी उपस्थित होते.१८ हातपंप पडले कोरडेठाकच्मसला गावातील मारोती मंदिर, गोकुळ गल्ली, नगर गल्ली, मुख्य रस्ता, जिल्हा परिषद शाळा आणि जुन्या गावातील सुमारे १८ हातपंप आणि विंधन विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. काही हातपंप दुरुस्तीअभावी बंद आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रश्न अधिकच बिकट झाला आहे.च्मागील सहा महिन्यांपासून गावकरी पाणीटंचाईने त्रस्त झाले आहेत. परिसरात पाणीसाठा शिल्लक नसून, प्रशासनानेच आता पाणीटंचाई दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीriverनदीdroughtदुष्काळ