शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ‘राहाटी’त २० दिवसांचाच साठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 00:25 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहाटी येथील बंधाºयात केवळ २० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला असून, पुढील पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी लवकरच पाण्याचे आवर्तन मनपाला घ्यावे लागणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राहाटी येथील बंधाºयात केवळ २० दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला असून, पुढील पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यासाठी लवकरच पाण्याचे आवर्तन मनपाला घ्यावे लागणार आहे.राहाटी बंधाºयातून परभणीकरांना पाणीपुरवठा केला जातो. या बंधाºयामध्ये दरवर्षी सिद्धेश्वर प्रकल्पातून पाणी घेतले जाते. मात्र यावर्षी या प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्याने सिद्धेश्वर बंधाºयातून चार आणि निम्न दुधना प्रकल्पातून दोन पाणी पाळ्या मंजूर झाल्या आहेत. या दोन्ही प्रकल्पांमध्ये परभणीकरांसाठी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. यावर्षी पाण्याची टंचाई वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाबरोबरच नागरिकांनाही जपून पाणी वापरावे लागणार आहे.परभणी शहरासाठी पुढील वर्षीच्या जून महिन्यापर्यंतचे पाण्याचे आरक्षण करण्यात आले आहे. या आरक्षण कोट्यातून ३ नोव्हेंबर रोजी पहिली पाणी पाळी सिद्धेश्वर प्रकल्पातून घेण्यात आली होती. राहाटी बंधाºयाची पाणी साठवण क्षमता १.५ दलघमी असून, एका पाणी पाळीतून मिळालेले पाणी साधारणत: दीड महिना शहरवासियांना पुरणार आहे. सध्या बंधाºयातील पाणीसाठ्याचा आढावा घेतला असता आणखी २० दिवस पुरेल एवढा साठा बंधाºयात शिल्लक आहे. त्यामुळे येत्या एक-दोन आठवड्यातच मनपाला पुढील पाणी पाळीचे नियोजन करावे लागणार आहे. प्रत्येक पाणी पाळीच्या वेळी सुमारे ८ दलघमी पाणी प्रकल्पातून सोडावे लागते, तेव्हा कुठे बंधाºयात दीड दलघमी पाणीसाठा जमा होतो. त्यामुळे ही परिस्थिती लक्षात घेता पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आव्हानही मनपासमोर उभे टाकले आहे.दहा दिवसांतून एक वेळा पाणीपरभणी शहरात सध्या अस्तित्वात असलेली पाणीपुरवठा योजना सुमारे ३० वर्षांपूर्वीची आहे. शहराच्या लोकसंख्येत दुप्पटीने वाढ झाली आहे. त्यामुळे या पाणीपुरवठा योजनेद्वारे संपूर्ण शहराला पाणी पुरविताना मनपाला कसरत करावी लागते. पाणीटंचाई नसतानाही शहराला ८ ते ९ दिवसांतून एक वेळा पाणी येत होेते. आता १० दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. एक वेळा पाणी सोडल्यानंतर तीन ते चार तास नळांना पाणी राहते. तीन ते चार तास पाणी सोडले तरच ते प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचते. दरम्यान, शहरात पाण्याचा अपव्यय देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक भागामध्ये नळांना तोट्या नाहीत. त्यामुळे पाणी भरणे झाल्यानंतर नळावाटे पाण्याचा अपव्यय होतो. सर्व नळजोडण्यांना तोट्या बसविणे बंधनकारक केल्यास होणारा पाण्याचा अपव्यय टळू शकतो. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महापालिकेला आता कडक धोरण राबवावे लागणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प