शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : शिक्षकांनी पं.स.त मांडले ठाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 00:31 IST

वेतन वेळेवर होत नसल्याने तालुक्यातील शिक्षकांनी २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पं.स. कार्यालयात ठिय्या मांडून वेतनाचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी): वेतन वेळेवर होत नसल्याने तालुक्यातील शिक्षकांनी २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पं.स. कार्यालयात ठिय्या मांडून वेतनाचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली.तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेल्या शिक्षकांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेतनाच्या विलंबामुळे मुलांच्या शैक्षणिक खर्चाबरोबरच गृहकर्ज व इतर कर्जाचे हप्ते फेडताना व्याजाचा भूर्दंड सहन करावा लागत आहे.त्यामुळे तालुक्यातील विविध गावांमधील शिक्षक, मुख्याध्यापकांनी २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास गंगाखेड पं.स. कार्यालय गाठून पंचायत समितीच्या प्रांगणातच ठिय्या मांडला. जुलै महिन्याचे वेतन सप्टेंबर महिन्याच्या १५ तारखेला अदा करण्यात आले. त्यानंतर आॅगस्ट महिन्याचे वेतन केव्हा होईल, याची शाश्वती नसल्याने शिक्षकांमध्ये संताप व्यक्त होत होता. वेतन होण्यास विलंब लागत असून या विलंबाची कारणे शोधून अडचणी दूर कराव्यात, शिक्षकांना वेळेवर वेतन अदा करावे, अशी मागणी करण्यात आली.शिक्षक व मुख्याध्यापकांच्या मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर यांनी स्वीकारले. शिक्षकांच्या वेतनाच्या प्रश्ना संदर्भात संबंधितांना त्वरित सूचना केल्या जातील, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी शिक्षक पतपेढीचे चेअरमन हरिश्चंद्र भोसले, रावसाहेब कातकडे, विठ्ठल चामे, गजानन लोळे, डी.एस. मुंडे, माणिकराव जाधव, माधव मुंडे, श्रीराम चिमले, माणिकराव नागरगोजे, कोंडिबा पवार, मधुकर जाधव आदींसह तालुक्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :parabhaniपरभणीTeacherशिक्षकagitationआंदोलन