शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
3
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
4
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
5
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
6
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
7
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
8
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
9
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
10
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
11
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
13
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
14
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
15
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
16
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
17
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
18
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
19
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
20
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल

परभणी :आॅनलाईन परिक्षेने विद्यार्थी रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 12:27 AM

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकविल्या जाणाºया ३५ अभ्यासक्रमांच्या परीक्षा आॅनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय ऐनवेळी झाल्याने परभणी येथील विविध अभ्यासक्रमाच्या (ट्रेडच्या) विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले़ सोमवारी सकाळी या विद्यार्थ्यांनी एकत्र येत आॅफलाईन परीक्षा घेण्याची मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकविल्या जाणाºया ३५ अभ्यासक्रमांच्या परीक्षा आॅनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय ऐनवेळी झाल्याने परभणी येथील विविध अभ्यासक्रमाच्या (ट्रेडच्या) विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले़ सोमवारी सकाळी या विद्यार्थ्यांनी एकत्र येत आॅफलाईन परीक्षा घेण्याची मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली़औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय केंद्रांवर प्रथम सत्राची परीक्षा घेतली जाणार होती़ परभणी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सुमारे ७०० विद्यार्थी ३५ वेगवेगळ्या अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेत आहेत़ या विद्यार्थ्यांची दरवर्षी आॅफलाईन पद्धतीनेच परीक्षा घेतली जाते़ त्यामुळे विद्यार्थ्यांनी याच परिक्षेची तयारी केली होती़५ व ६ फेबु्रवारी रोजी नियोजित परीक्षा होणार होती; परंतु, ऐनवेळी व्यवसाय शिक्षण, प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालकांनी पत्र पाठवून जिल्हास्तरावर होणारी ही परीक्षा ओएमआर बेसड् (आॅफलाईन) न घेता आॅनलाईन संगणकावर परीक्षा घेण्याच्या सूचना केल्या़ तसेच याच पत्राद्वारे परिक्षेचे वेळापत्रकही बदलल्याचे जाहीर करण्यात आले़ त्यात १७ फेब्रुवारीपासून आॅनलाईन परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़आॅफलाईन पद्धतीने परीक्षा देण्याची तयारी करून विद्यार्थी सोमवारी येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात दाखल झाले़ मात्र या परीक्षा आॅनलाईन घेतल्या जाणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांना दिल्यानंतर एकच गोंधळ उडाला़ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अनेक अभ्यासक्रमामध्ये प्रत्यक्ष संगणकाचा वापर होत नाही, असे असताना संगणकावर परीक्षा घेतली तर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते़ त्यामुळे या निर्णयाला विरोध करीत विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला़ हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गंगाधर जवंजाळ हे देखील परीक्षा केंद्रावर दाखल झाले़ या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची बाब त्यांनी प्राचार्यांना निदर्शनास आणून दिली़ त्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यासह जिल्हाधिकाºयांनाही निवेदन देऊन आॅनलाईन परीक्षा रद्द करून पूर्वीप्रमाणेच आॅफलाईन परीक्षा घेण्याची मागणी केली़ निवेदनावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गंगाधर जवंजाळ, केशव काळे, पांडूरंग काळे, अतिष खाकरे, आत्माराम पुजारी, नितीन वाव्हुळे, गोपाळ साबळे, अमोल जाधव, मंचक सोनुले, आकाश इंगोले, बालाजी पांचाळ, सुरेश पुंडगे, ज्ञानेश्वर हांडगे, आनंद भुजबळ, अमर साळुंखे, आकाश रेंगे आदींच्या सह्या आहेत़केंद्रावर भौतिक : सुविधांचा अभावऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये संगणकाशी संदर्भात एकही अभ्यासक्रम नाही़ त्यामुळे प्रशिक्षण संस्थेत संगणकांची कमतरता आहे़ प्रशासकीय कामकाजासाठी वापरल्या जाणाºया संगणकांवरच परीक्षा घ्यावी लागणार आहे़ त्यामुळे ही परीक्षा घेताना अडचणी निर्माण होवू शकतात़ तसेच विद्यार्थ्यांना पूर्व कल्पना न देता ऐनवेळी आॅनलाईन परीक्षा घेण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होवू शकते़ अशा वेळी परीक्षेच्या संदर्भाने उचित निर्णय घ्यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे़व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून आॅनलाईन परीक्षा घेण्याचे पत्र आम्हाला ३ फेबु्रवारी रोजी प्राप्त झाले़ या पत्रानुसार आम्ही इन्फ्रस्ट्रक्चर उपलब्ध नसल्याचे कळविले आहे़ विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतच आॅनलाईन परिक्षेसाठी आजपासूनच १७ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे़ तसे बॅचेसचे नियोजनही केले आहे़ वरिष्ठांच्या निर्णयानुसार प्रशिक्षण संस्थेतील एम़ए़बी़आऱ, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, वायरमन, इलेक्ट्रॉनिक्स, फिटर आदी सहा अभ्यासक्रमांच्या परीक्षा आॅफलाईन पद्धतीने सुरू आहेत़ उर्वरित ३५ ट्रेडच्या परीक्षा आॅनलाईन होणार आहेत़-एम़डी़ देशमुख, प्राचार्या, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी