शहरं
Join us  
Trending Stories
1
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
2
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
3
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर
4
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
5
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
6
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
7
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
8
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
9
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
10
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
11
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
12
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
13
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
14
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
15
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
16
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
17
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
18
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
19
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
20
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?

परभणी : संघर्ष समितीचा पाण्यासाठी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:29 IST

लोअर दुधना प्रकल्पातील पाणी दुधना नदीपात्रात सोडण्याच्या मागणीसाठी दुष्काळ निवारण व पाणीटंचाई संघर्ष समितीच्या वतीने तालुक्यातील दुधना काठावरील ११ गावातील ग्रामस्थांनी १८ मे रोजी मानवतरोडवर एक तास रास्ता रोको केला.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी): लोअर दुधना प्रकल्पातील पाणी दुधना नदीपात्रात सोडण्याच्या मागणीसाठी दुष्काळ निवारण व पाणीटंचाई संघर्ष समितीच्या वतीने तालुक्यातील दुधना काठावरील ११ गावातील ग्रामस्थांनी १८ मे रोजी मानवतरोडवर एक तास रास्ता रोको केला.यावर्षी तालुक्यात अत्यल्प पर्जन्यमान झाले आहे. यामुळे तालुक्यात पाणीपातळी खालावली असून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दुधना प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असताना तालुक्यासाठी पाणी आवर्तन सोडले जात नाही. यामुळे तालुक्यातील गोगलगाव, सावंगी मगर, इरळद, मंगरुळ, नरळद, टाकळी नीलवर्ण, कोथाळा, राजुरा, शेवडी जहांगीर व पार्डी या गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील दुधना काठावरील या ११ गावातील ग्रामस्थांनी बैलगाडीसह मानवतरोड येथे रास्तारोको केला. ११.३० ते १२.१५ या वेळेत हे आंदोलन सुरु होते. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. माजी मंत्री सुरेश वरपूडकर, लिंबाजी कचरे, अशोक बुरखुंडे, बाळासाहेब आळणे, दीपक लिपने यांची भाषणे झाली. संघर्ष समितीचे बाळासाहेब आळणे, लिंबाजी कचरे, भगवान मुळे, संजय देशमुख, अण्णासाहेब मगर, दत्तराव मगर, सुभाष देशमुख, रामराजे महाडिक, रमेश कदम, शिवाजी मुळे, प्रभाकर बारहाते, एकनाथ मोगरे, किशोर कचरे, संजय देशमुख, भगवान मुळे, नारायण आवचार, रामदास कचरे, बालाजी बरडे, अशोक बुरखुंडे, देविदास शिंदे, वसंत शिंदे, माणिक कदम, रमेश कदम, कोंडिबा पाते आदी सहभागी झाले होते. नायब तहसीलदार नकुल वांघुडे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले. आंदोलना दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस निरीक्षक रमेश स्वामी, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण दिनकर, शिवशंकर मन्नाळे, नागनाथ कुकडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.आंदोलकांवर गुन्हे दाखलदुधना नदीपात्रात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी संघर्ष समितीच्या वतीने शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग अडविणे, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न करणे ही कारणे देऊन पोलिसांनी २२ आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये लिंबाजी कचरे, बाळासाहेब आळणे, शिवाजी मुळे, प्रभाकर बारहाते, एकनाथ मोगरे, किशन कचरे, संजय देशमुख, भगवान मुळे, नारायण आवचार, रामराजे महाडिक, रामदास कचरे, बालाजी बरडे, अशोक बुरखुंडे, देविदास शिंदे, वसंत शिंदे, माणिक कदम, रमेश कदम, कोंडिबा पाते, शिवशंकर पाते, अण्णासाहेब मगर या आंदोलकांचा समावेश आहे. आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीwater scarcityपाणी टंचाईagitationआंदोलन