शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : कालव्याच्या पाण्यासाठी एक तास रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 23:56 IST

निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून दोन पाणी पाळ्या सोडाव्यात, या मागणीसाठी सोमवारी दबाव गटाच्या वतीने एक तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून दोन पाणी पाळ्या सोडाव्यात, या मागणीसाठी सोमवारी दबाव गटाच्या वतीने एक तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.तालुक्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. खरिपाची पिके हातची गेली असून रबी हंगामात पेरणीच झाली नाही.तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पामध्ये सध्या मूबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. हे पाणी कालव्याला सोडल्यास पिण्याच्या पाण्यासह सिंचन व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही सुटू शकतो. त्यामुळे दोन्ही कालव्यातून पाणी सोडावे, या मागणीसाठी दबाव गटाच्या वतीने सोमवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. येथील रायगड कॉर्नर भागात कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. यावेळी प्रशासनाकडे पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली. कालव्याला पाणी सोडल्यास ज्वारीची पेरणी करता येईल, त्यातून चाºयाचा प्रश्न निकाली निघू शकतो, असे प्रशासनाला सांगण्यात आले. आंदोलनानंतर तहसीलदार आसाराम छडीदार यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.या आंदोलनात दबाव गटाचे निमंत्रक अ‍ॅड. श्रीकांत वाईकर, अ‍ॅड. पी.ए. चव्हाण, ओमप्रकाश पौळ, विठ्ठल काळे, सोनू शेवाळे, इसाक पटेल, जयसिंग शेळके, उदय पावडे, बाबा भाबट, पुंजाराम शेवाळे आदींसह दबाव गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनामुळे रायगड कॉर्नर भागातील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.दबाव गटाने लावून धरली मागणीसेलू तालुक्यातील पाण्याचा प्रश्न दबाव गटाने उचलून धरला आहे. यापूर्वी दुष्काळाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सेलू तालुक्याचा दौरा केला होता. त्यावेळीही दबाव गटाने पाटील यांना निवेदन देऊन तालुक्यातील पाणीप्रश्न त्यांच्यासमोर मांडला होता. त्यानंतर सोमवारी आंदोलनाच्या माध्यमातून मागणी रेटून धरली.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीagitationआंदोलन