शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : किसान सभेचे रास्ता रोको आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:51 IST

दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने १९ नोव्हेंबर रोजी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी ): दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नांवर तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी किसान सभेच्या वतीने १९ नोव्हेंबर रोजी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. दुपारी एक वाजेपर्यंत हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. निम्न दुधना प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडून इरळद, सावंगी, सोन्ना, गोगलगाव, मंगरूळ, नरळद, कोठाळा, टाकळी, पार्डी, शेवडी, राजूरा या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढावा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांचे अनुदान वाटप करावे, पीक कर्जाचे पुनर्गठण करून तात्काळ कर्जाचे वाटप करावे इ. मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.आंदोलनात विलास बाबर, लिंबाजी कचरे पाटील, अशोक बुरखुंडे, संजय देशमुख, रामराजे महाडिक, बाबाराव आळणे, उद्धव निर्वळ, आनंद भक्ते, मुकुंद मगर, विष्णू जाधव, बाळासाहेब भिसे, सुभाष देशमुख, धनंजय तुरे, अशोक कचरे आदी सहभागी झाले होते. नायब तहसीलदार नकूल वाघुंडे यांनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.मानवत तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणीटंचाई, चाराटंचाई, रोजगार अशा समस्यांना ग्रामस्थ तोंड देत असताना प्रशासनाकडून मात्र उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे किसान सभेने प्रशासनाच्या विरोधात हे आंदोलन केले.

टॅग्स :parabhaniपरभणीagitationआंदोलनFarmerशेतकरी