शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पोलीस कर्मचाऱ्यासह चौघांच्या घरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 00:47 IST

जिंतूर शहरातील संभाजीनगर भागातील एका पोलीस कर्मचाºयासह चार जणांच्या घरी एकाच रात्री चोरी करून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी रात्री २ ते ३ च्या सुमारास घडली़

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (जि. परभणी) : जिंतूर शहरातील संभाजीनगर भागातील एका पोलीस कर्मचाºयासह चार जणांच्या घरी एकाच रात्री चोरी करून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी रात्री २ ते ३ च्या सुमारास घडली़जिंतूर शहरातील संभाजीनगर येथील सेवानिवृत्त लेखाधिकारी बळीराम बाळू चव्हाण हे गोकूळ आष्टमीनिमित्त त्यांच्या कवडा या मूळ गावाकडे मंगळवारी सकाळी गेले होते़ ते ५ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता जिंतूर येथे आले असता, त्यांच्या घराचा कडीकोंडा तुटल्याचे लक्षात आल़े़ त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिले असता, घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले़ तसेच कपाटात ठेवलेले ३ तोळे सोन्याचे गंठण, ११ ग्रॅम सोन्याचे लॉकेट, १४ ग्रॅमचे सोन्याचे एक गंठण, ७, ५, ३, ४, १, ३़५, ५, ४ ग्रॅमच्या सोन्याच्या अंगठ्या व अन्य सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख १९ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला़ तसेच त्यांच्या शेजारी राहणारे पोलीस कर्मचारी पांडुरंग साहेबराव तुपसमुंदर यांच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी वॉचमनसाठी तयार केलेल्या शेडमधील २० हजार रुपये किंमतीचा टीव्ही व २ हजार रुपये किंमतीचे दागिने असा २२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला़ याबाबत चव्हाण यांच्या फिर्यादीवरून जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़दुसरी तक्रार रवि रामलाल चोरडिया यांनी दिली आहे़ त्यामध्ये मंगळवारी रात्री त्यांच्या घरातून रोख ८० हजार रुपये, सोन्याचे-चांदीचे दागिने, टीव्ही असा एकूण ४ लाख २८ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे नमूद करण्यात आले आहे़ यावरून जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या शिवाय अन्य एका ठिकाणीही चोरीची घटना घडली़ परंतु, जिंतूर पोलिसांकडे तक्रार मात्र आली नव्हती़

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसHomeघरGoldसोनं