शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

परभणी : परिस्थिती दुष्काळ सदृश्य अन् पालकमंत्री अदृश्य - अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:13 IST

परभणी जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळाच्या यादीतून वगळून अगोदरच जिल्ह्यावर अन्याय करण्यात आला आहे़ अशात मुख्यमंत्रीही दुष्काळ सदृश्य परिस्थिती संबोधत आहेत़ त्यांच्याच भाषेनुसार जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना पालकमंत्री मात्र जिल्ह्यातील जनतेला वाऱ्यावर सोडून अदृश्य झाले आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोकराव चव्हाण यांनी सोमवारी येथे बोलताना केली़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : परभणी जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळाच्या यादीतून वगळून अगोदरच जिल्ह्यावर अन्याय करण्यात आला आहे़ अशात मुख्यमंत्रीही दुष्काळ सदृश्य परिस्थिती संबोधत आहेत़ त्यांच्याच भाषेनुसार जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना पालकमंत्री मात्र जिल्ह्यातील जनतेला वाऱ्यावर सोडून अदृश्य झाले आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोकराव चव्हाण यांनी सोमवारी येथे बोलताना केली़काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेल्या जनसंघर्ष यात्रेंतर्गत पाथरी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी व्यासपीठावर खा़ राजीव सातव, विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, माजी खा़ तुकाराम रेंगे, माजी आ़ सुरेश देशमुख, पंडितराव चोखट, बालकिशन चांडक, रामभाऊ घाडगे, समशेर वरपूडकर, प्रभाकर शिंदे, हरिभाऊ शेळके, जयश्री खोबे, प्रेरणा वरपूडकर, द्वारकाबाई कांबळे, बाळासाहेब रसाळ, धोंडीराम चव्हाण आदी उपस्थित होते़ यावेळी बोलताना अशोकराव चव्हाण म्हणाले की, परभणी जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे़ तरीही जिंतूर, गंगाखेड व पूर्णा ही तीन तालुके वगळून जिल्ह्यावर अन्याय करण्यात आला आहे़ त्यामुळे या सरकारला आता तुम्हीच धडा शिकवा़ लोकसभा निवडणुकीनंतर परभणी महापालिकेत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवून विजयाची सुरुवात केली आहे़ त्यामुळे आता जिल्हा काँगे्रसमय करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले़ शिवसेना सत्तेत राहून मलिदा लाटत आहे आणि रस्त्यावर येऊन विरोधाचे नाटक करीत आहे़ यांचे ढोंग जनतेला कळून चुकले आहे़ ‘आतून कीर्तन बाहेरून तमाशा’ अशी या दोन्ही पक्षांची स्थिती आहे़ आम्ही ‘दोघे भाऊ मिळून सर्व खाऊ’ असेच राज्यात सुरू आहे, असेही ते म्हणाले़ २०१४ च्या निवडणुकीत भाजपा-शिवसेनेला फक्त ३० टक्के मते मिळाली होती़ परंतु, ७० टक्के मतांचे विभाजन झाले़ त्यामुळे ते सत्तेत आले़ आता तशी चूक होऊ देऊ नका़ एमआयएम, मनसेला सोडून बाकी ७० टक्क्यांना एकत्र करून त्यांच्या पाठीशी उभे राहा़ महानगरपालिकेप्रमाणे काँग्रेसला साथ द्या, असेही त्यांनी यावेळी आवाहन केले़ भारतरत्न डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले देशाचे संविधान बदलण्याचा भाजपाकडून प्रयत्न सुरू आहे़ हा प्रयत्न हाणून पाडा, असे आवाहन चव्हाण यांनी केले़ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घराघरामध्ये पोहचून जनसंपर्क वाढवावा, भाजपाची खोटी आश्वासने जनतेसमोर मांडून काँग्रेस-आघाडी सरकारच्या काळात घेतलेल्या जनहिताच्या निर्णयाची माहिती जनतेला द्यावी, असेही यावेळी ते म्हणाले़ यावेळी खा. सातव यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष वरपूडकर यांनी केले़ कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाबा ढगे, विजय घुंबरे, मुखीद जहागीरदार, अली अफसर अन्सारी आदींनी परिश्रम घेतले़जायकवाडीचे हक्काचे : पाणी मिळायला हवे४यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, जायकवाडी धरणाची निर्मिती करतेवेळी कोणत्या भागाला किती पाणी मिळाले पाहिजे, हे निश्चित केलेले असल्याने मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळायला पाहिजे़ राज्य सरकार मराठवाड्यातील धरणांना निकामी करण्याचे काम करीत आहे़ निर्णय होऊनही पाणी सोडले जात नाही, हा सरकारचा नाकर्तेपणा आहे, असे ते म्हणाले़ जलयुक्तची कामे ज्या ठिकाणी झाली, त्याच ठिकाणी पाणी पातळी खोलवर गेल्याचे सांगून ही कामे जलयुक्त नव्हे तर ‘झोलयुक्त’ झाली आहेत, असेही यावेळी ते म्हणाले़

टॅग्स :parabhaniपरभणीcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाण