शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

परभणी ; शालेय पोषण आहार तपासणीपथकाचा दौरा रद्द; मुख्याध्यापक सुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:24 IST

राज्यातील शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी येणाऱ्या केंद्र शासनाच्या ११ सदस्यांचा जिल्हा दौरा बारगळल्याने या दौºयाची धास्ती घेतलेल्या जिल्ह्यातील काही मुख्याध्यापकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्यातील शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी येणाऱ्या केंद्र शासनाच्या ११ सदस्यांचा जिल्हा दौरा बारगळल्याने या दौºयाची धास्ती घेतलेल्या जिल्ह्यातील काही मुख्याध्यापकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.राज्यातील जिल्हा परिषदेच्या तसेच अनुदानित व विना अनुदानित शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना आठवड्यातील सहा दिवस विविध प्रकारचा पोषण आहार दिला जातो. यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. या महत्त्वकांक्षी योजनेची अंमलबजावणी राज्यात व्यवस्थित होते की नाही, याची पडताळणी करण्यासाठी केंद्र शासनाने ११ सदस्यांचे पथक नियुक्त केले होते. त्यामध्ये अन्न व पोषण विभागाच्या केंद्रातील प्रमुख प्रा.उमा भोयर यांची पथकप्रमुख म्हणून तर शालेय पोषण आहारच्या संचालक जी.विजया भास्कर, प्राथमिक शिक्षण संचालक सुनील चव्हाण, सहाय्यक प्रा.स्वाती ध्रुव, युनिसेफचे प्रतिनिधी, मुख्य सल्लागार भुपेंद्र कुमार, वरिष्ठ सल्लागार दिनेश प्रधान यांची सदस्य म्हणून तर सहाय्यक संशोधक म्हणून डॉ.श्रूती कांटावाला, श्वेता पटेल, दिव्या पटेल, मयुरी राणा यांचा पथकात समावेश होता.३ ते १० डिसेंबर दरम्यान या पथकातील अधिकारी राज्यातील विविध शाळांना भेटी देऊन शालेय पोषण आहाराबाबतची माहिती घेणार होते. त्यानुसार या पथकाला प्रारंभी साताºयाला तपासणीसाठी जायचे होते; परंतु, या पथकाने ५ डिसेंबर रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळची सहल केली. त्यानंतर दुपारी शिर्डीमध्ये साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर या पथकाने मराठवाड्यातील शाळांची तपासणी करणे आवश्यक होते; परंतु, तपासणी न करताच हे पथक निघून गेले. १० डिसेंबरपर्यंत पथकाचा दौरा असल्याने सोमवारपर्यंत पथक जिल्ह्यात तपासणीसाठी येईल, याची विविध शाळांमधील काही मुख्याध्यापकांना धास्ती होती; परंतु, या पथकाने परभणी जिल्ह्यात न येताच आपला दौरा गुंडाळला. त्यामुळे विविध शाळांमधील मुख्याध्यापकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.या बाबींची केली होती तयारी४शालेय पोषण आहार योजना अंमलबजावणीबाबची पाहणी करण्यासाठी येणाºया पथकाची सर्व शाळांनी तयारी केली होती. या अनुषंगाने उपलब्ध असलेली कागदपत्रे तयार करुन ठेवण्यात आली होती. स्वयंपाकगृहाची साफसफाई करण्यात आली होती. तसेच स्टॉक रजिस्टर, धान्यादिमाल उपलब्ध करुन ठेवण्यात आला होता. तसेच वैद्यकीय दाखला, नोंदणी पत्रक, मेनू प्रमाणे आहार देण्याची माहिती (प्रत्यक्ष फक्त पिवळा भात दिला जातो), हॅण्डवॉश, साबण विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी, टॉवेल, आसनपट्ट्या आदी बाबतची व्यवस्था करण्याचेही आदेश देण्यात आले होते. त्यानुसार विविध मुख्याध्यापकांनी तशी तयारी केली होती; परंतु, पथकाचा दौराच रद्द झाल्याने मुख्याध्यापकांची या बाबीतून सुटका झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीSchoolशाळाStudentविद्यार्थी