शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : गोदावरी नदी पात्रात वाळूचा चोरबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 23:53 IST

तालुक्यातील नाथ्रा ते मुदगल या ५० कि.मी. वाळू पट्यात रात्रीच्या वेळी चोरट्या पद्धतीने वाळूचा खुलेआम उपसा केला जात आहे. गोदावरीच्या पात्रात रात्री ट्रॅक्टर आणि ट्रकमधून चोरून वाळू वाहतूक होत असताना महसूल यंत्रणा मात्र मूग गिळून गप्प आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): तालुक्यातील नाथ्रा ते मुदगल या ५० कि.मी. वाळू पट्यात रात्रीच्या वेळी चोरट्या पद्धतीने वाळूचा खुलेआम उपसा केला जात आहे. गोदावरीच्या पात्रात रात्री ट्रॅक्टर आणि ट्रकमधून चोरून वाळू वाहतूक होत असताना महसूल यंत्रणा मात्र मूग गिळून गप्प आहे.पाथरी तालुक्यात गोदावरी नदीचे पात्र असून नाथ्रा ते मुदगल या ५० कि. मी. अंतरावर २२ वाळुचे धक्के आहेत. मागील अनेक वर्षापासून या वाळू धक्यातून कधी अधिकृतरित्या तर कधी अनाधिकृतरित्या वाळुचा उपसा होत आलेला आहे. मागील काही वर्षात वाळुला चांगलीच मागणी आली आहे. गोदावरी नदी पात्रात वाळू उपशासाठी कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेची मान्यता आवश्यक असल्याने नागरिकही संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पात्रातील वाळू उपशास विरोध करीत असल्याचे चित्र आहे. गतवर्षी तालुक्यात गोपेगाव आणि पिंपरी या दोन गावांच्या कार्यक्षेत्रात वाळुचे लिलाव झाले होते.लिलाव झाल्यानंतरही या गावात अनाधिकृतरित्या वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी होत्या. गतवर्षी वाळुचा भावही तीन ते चार हजार रुपये ब्रॉस होता. गतवषीर्च्या लिलावातील मुदत सप्टेंबर २०१७ ला संपली. त्यानंतर २०१८-१९ या वर्षासाठी तालुक्यातील वाळू घाटाची महसूल यंत्रणेने लिलाव प्रक्रिया आॅकटोबर, नोव्हेबर या महिन्यात सुरू केली होती.पाथरी तालुक्यात सात वाळू घाटांच्या लिलावाचे जाहीर प्रगटन प्रसिद्ध झाले होते. मात्र अचानक हरित लवादाने वाळू उपशास बंदी घातली. त्यामुळे जिल्हाभरात अधिकृतरित्या एकही वाळुचा धक्का सुरू नाही. वाळू ठेके बंद असल्याने शासकीय कामावरही त्याचा परिणाम झाला आहे. घरकुलाचे काम रखडले आहे. तसेच ग्रामीण भागात नवीन बांधकाम सुरूवात होण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. एकीकडे खुलेआम वाळू बाजारात उपलब्ध होत नाही. तर दुसरीकडे चोरट्या वाळूचा बाजारही असल्याचे पहावयास मिळत आहे. गोदावरी नदीच्या पात्रात उपलब्ध असलेल्या ठिकाणी रात्री वाळूची वाहतूक सुरू आहे.नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित नाही. त्यामुळे वाळू तस्करांचे चांगलेच फावले आहे. चोरट्या वाळुचा भावही तसाच तेजीत चालत आहे. नाविलाजास्तव म्हणून महागड्या दराने वाळू खरेदी करावी लागत आहे.दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून नाथ्रा ते मुदगल या ५० कि.मी. गोदावरीच्या वाळू पट्यातून सर्रास अवैध वाळू उपसा सुरू असताना तालुका महसूल प्रशासन व जिल्हा प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे फावत आहे.घरकुलाचे : काम पडले ठप्पशासनाच्या एका निर्णयानुसार व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार घरकुल योजनेंतर्गत बांधकामासाठी ४३० रुपये ब्रॉस प्रमाणे वाळू वाटपाचे काम तालुक्यात सुरू झाले होते. मात्र हरित लवादाच्या निर्णयानंतर घरकूल बांधकामासाठी वाळू उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया थंडावली आहे. त्यामुळे घरकूल बांधकामेही ठप्प पडली आहेत.वाळूसाठी लाभार्थ्यांना माराव्या लागतात चकरा४घरकूल बांधकामासाठी तहसील कार्यालयाकडून रॉयल्टी भरून वाळू उत्खनन परवानगी देण्यात येत होती.४मात्र लाभार्थ्यांनी पंचायत समिती मार्फत रॉयल्टीची रक्कम भरूनही वाळू उपलब्ध होत नसल्याने लाभार्थी पंचायत समितीकडे चकरा मारू लागले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूtheftचोरी