शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

परभणी : महसूलचे कर्मचारी आता ‘ड्रेसकोड’ मध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 00:18 IST

येथील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी आता दर सोमवार व शुक्रवार असे दोन दिवस ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांच्या संकल्पनेतून जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी आता दर सोमवार व शुक्रवार असे दोन दिवस ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जिल्हा प्रशासनाचे काम विशिष्ट शिष्टाचार व ठराविक कार्यपद्धतीनुसार होणे अपेक्षित असल्याने त्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाºयांसाठी ड्रेसकोड लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांच्या संकल्पनेनुसार घेण्यात आलेल्या या निर्णयासंदर्भातील आदेश २९ जून रोजी सर्व विभागप्रमुखांच्या नावे काढण्यात आला. त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील वर्ग १, वर्ग २ आणि वर्ग ३ चे पुरुष अधिकारी व कर्मचारी दर सोमवारी पांढºया रंगाचा शर्ट परिधान करतील व सर्व महिला अधिकारी व कर्मचारी पांढºया रंगाची साडी किंवा पंजाबी ड्रेस या दिवशी परिधान करतील. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खादी वापरण्यासाठी केलेल्या आवाहनानुसार दर शुक्रवारी सर्व पुरुष अधिकारी- कर्मचारी शक्यतो कोणत्याही रंगाचा; परंतु, खादीचा शर्ट परिधान करतील व महिला अधिकारी किंवा कर्मचारी शक्यतो खादीची साडी किंवा कोणत्याही रंगाचा खादीचा पंजाबी ड्रेस परिधान करतील. जिल्हाधिकाºयांनी घालून दिलेल्या या निर्णयाचे तंतोतंत पालन करावे व पोशाखाच्या दर्शनी भागात संबंधित कर्मचाºयाने आपले ओळखपत्र धारण करावे, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने अधिकारी- कर्मचाºयांसाठी ड्रेसकोड लागू करण्याचा स्तुत्य निर्णय घेण्यात आला असला तरी तो किती दिवस प्रभावीपणे लागू राहील, या विषयी जिल्हावासियांना उत्सुकता लागली आहे.परभणी महानगरपालिकेत तत्कालीन आयुक्त राहुल रेखावार यांनीही कर्मचारी- अधिकाºयांसाठी ड्रेसकोड लागू केला होता. रेखावार यांची जशी बदली झाली, तशी ड्रेसकोडची पद्धत बंद झाल्याचा प्रकार मनपात पहावयास मिळाला आहे, हे विशेष होय.प्रत्येक बुधवारी ‘नो व्हेईकल डे’४जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी व अधिकाºयांच्या वतीने दर महिन्यात प्रत्येक बुधवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळण्यात येणार आहे. या दिवशी पूर्व नियोजित दौरे वगळता संबंधित अधिकारी व कर्मचारी खाजगी किंवा शासकीय वाहनाने कार्यालयात न येता सार्वजनिक परिवहनचा वापर करणार आहेत किंवा ते पायी अथवा सायकलीने कार्यालयात येणार आहेत. या संदर्भातील निर्णय सोमवारी घेण्यात आला.बायोमॅट्रिक उपस्थितीबाबत कडक नियमावलीजिल्हाधिकारी कार्यालयात आता कर्मचारी- अधिकाºयांच्या उपस्थितीसाठी आधार बेसड् बायोमॅट्रिक प्रणाली लागू करण्यात आली आहे. असे असताना काही कर्मचारी उपस्थिती नोंदविल्यानंतर दुपारी जेवणासाठी बाहेर जातात व बराच वेळ कार्यालयात अनुपस्थित राहतात. त्यामुळे अशा कर्मचाºयांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिला आहे. कार्यालयाबाहेर जाताना संबंधित कर्मचाºयांनी हालचाल रजिस्टरवर तशी नोंद करणे अनिवार्य आहे. संबंधित कर्मचारी- अधिकारी नोंद न करताच कार्यालयाबाहेर गेल्यास त्यांची रजा नोंदविण्यात येईल, असेही जिल्हाधिकाºयांनी काढलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.प्रशासकीय कामकाज गतीमान करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने २००५ मध्ये अधिकारी- कर्मचाºयांवर अंकुश ठेवणारा दफ्तर दिरंगाई कायदा लागू केला होता. हा कायदा लागू होऊन जवळपास १३ वर्र्षांचा कालावधी लोटला आहे; परंतु, या कायद्याची फारसी अंमलबजावणीच होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी पुढाकार घेऊन दफ्तर दिरंगाई कायदा प्रभावीपणे जिल्ह्यात राबवावा, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.‘दफ्तर दिरंगाई कायद्याची कडक अंमलबजावणी करा’

टॅग्स :parabhaniपरभणीEmployeeकर्मचारीRevenue Departmentमहसूल विभाग