शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
3
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
4
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
5
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
6
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
7
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
8
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
9
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
10
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
11
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
12
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
13
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
14
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
15
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
16
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
17
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
18
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
19
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
20
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."

परभणी : मुद्रांक विक्रीतून ४ कोटींचा महसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:53 AM

जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी घ्याव्या लागणाऱ्या मुद्रांकातून जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत एका महिन्यामध्ये ४ कोटी २१ लाख ५ हजार ३९० रुपयांचा महसूल जमा झाला आहे़ जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने जमीन खरेदी-विक्री व्यवहारावरही त्याचा परिणाम झाला असेल, अशी शक्यता होती़ परंतु, डिसेंबर महिन्यातील मुद्रांक विक्रीच्या आकड्यातून हे व्यवहार वाढले असल्याचे समोर येत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जमिनीच्या खरेदी-विक्रीसाठी घ्याव्या लागणाऱ्या मुद्रांकातून जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत एका महिन्यामध्ये ४ कोटी २१ लाख ५ हजार ३९० रुपयांचा महसूल जमा झाला आहे़ जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने जमीन खरेदी-विक्री व्यवहारावरही त्याचा परिणाम झाला असेल, अशी शक्यता होती़ परंतु, डिसेंबर महिन्यातील मुद्रांक विक्रीच्या आकड्यातून हे व्यवहार वाढले असल्याचे समोर येत आहे़शेत जमीन, प्लॉट, घरांची खरेदी-विक्री करण्यासाठी मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयातून व्यवहार करावे लागतात़ खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना जमिनीच्या प्रत्यक्ष शासकीय दरानुसार दस्त खरेदी केले जातात़ त्यावरून जमिनीचा फेरफार आणि खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असतात़ जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यापासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे़ परतीचा पाऊस नसल्याने रबीच्या हंगामावर पाणी फेरले गेले़ त्यामुळे संपूर्ण कृषी व्यवसाय आर्थिक कचाट्यात सापडला आहे़ जिल्ह्यात कृषी व्यवसायावरच इतर सर्व बाजारपेठांची दारोमदार अवलंबून आहे़ दुष्काळाचा परिणाम सर्वच बाजारपेठांवर झाला आहे़ नवा मोंढा भागातील कृषी निविष्ठांची बाजारपेठ असो किंवा कापड बाजार, सराफा बाजार आणि भुसार बाजारात सध्या मंदीची लाट आहे़ ग्राहक नसल्याने हे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत़ त्यामुळे जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या अनुषंगाने दुष्काळाच्या झालेल्या परिणामाची माहिती घेतली तेव्हा हे व्यवहार कमी झाले नसून ते वाढले असल्याचे समोर आले आहे़ जिल्ह्यामध्ये परभणी येथील मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय आणि तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या कार्यालयामधून खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात़ मागील वर्षीच्या डिसेंबर महिन्यामध्ये परभणी जिल्ह्यात २ हजार ३६५ दस्तांची विक्री झाली होती़ त्यातून जिल्हा मुद्रांक अधिकारी कार्यालयाला २ कोटी ९४ लाख १५ हजार ९९५ रुपयांचा महसूल मिळाला़ तर २०१८ च्या डिसेंबर महिन्यात २ हजार ३९७ दस्तांची विक्री झाली आहे़ यातून ४ कोटी २१ लाख ५ हजार ३९० रुपयांचा महसूल जिल्हा प्रशासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे़ विशेष म्हणजे २०१७ आणि २०१८ या दोन वर्षातील डिसेंबर महिन्यातील दस्त विक्रीचा आढावा घेतला असता २०१८ च्या डिसेंबर महिन्यात दुष्काळी परिस्थिती असतानाही ३२ दस्तांची विक्री वाढली आहे़ नोव्हेंबर महिन्यात मात्र दस्तांच्या विक्रीत थोडासा परिणाम झाला आहे़ नोव्हेंबर २०१७ मध्ये १ हजार ८३६ दस्तांची विक्री झाली़ त्यातून २ कोटी ९४ लाख ६८ हजार ३५० रुपयांचा महसूल मिळाला़ तर नोव्हेंबर २०१८ मध्ये १ हजार ७१३ दस्तांची विक्री झाली असून, त्यातून २ कोटी ९३ लाख ३८ हजार ७२० रुपयांचा महसूल प्रशासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे़या महिन्यात मागील वर्षाच्या तुलनेत फारसा फरक झाला नसला तरी दस्तांची विक्री घटली आहे़ दुष्काळी परिस्थितीमध्ये खरेदी-विक्रीचे व्यवहार घटणे अपेक्षित होते़ परंतु, तुलनात्मक दृष्टीकोणातून घेतलेल्या आकड्यांवरून खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले असल्याचेच स्पष्ट होत आहे़ दुष्काळी परिस्थितीतही जमीन, प्लॉट खरेदी-विक्रीवर फारसा परिणाम झाला नसल्याचे दिसून येत आहे़पैशांच्या चणचणीतून : खरेदी-विक्री४ग्रामीण भागामध्ये दुष्काळ अधिक तीव्र आहे़ उत्पन्नासाठी दुसरे कुठलेही साधन शेतकºयांकडे उपलब्ध नाही़ दैनंदिन गरजा तर भागविणे आवश्यक आहे़ अशा परिस्थितीत पैसा उपलब्ध करायचा कसा? असा शेतकºयांसमोर मोठा प्रश्न निर्माण होत आहे़ बँकांमधून तातडीचे कर्ज मिळत नाही़ खाजगी कर्ज घेताना गहाणखत करावे लागते़ त्यामुळे घरातील जमिनीचा तुकडा विकून तात्पुरती व्यवस्था करण्यावर शेतकरी, सर्वसामान्य नागरिक भर देतात़ त्वरित पैसा उपलब्ध होत असल्याने मिळेल ते दर घेवून शेतातील काही भाग, राखून ठेवलेले प्लॉट विक्री केले जात असावेत आणि त्यातूनच जमिनीच्या खरेदी-विक्रीमध्ये वाढ झाली असावी, अशी एक शक्यताही वर्तविली जात आहे़मूल्यांकनाचे दर वाढल्याने महसूलात वाढ४२०१७ मध्ये जमिनीच्या मूल्यांकनाचे दर कमी होते़ २०१८ मध्ये या दरात वाढ झाल्यामुळे महसूलामध्ये वाढ झाली आहे़ परंतु, मुद्रांक विक्रीतही तेवढीच वाढ झाली आहे़ त्यामुळे प्रत्यक्ष मुद्रांक विक्रीवरून खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढत असल्याचेच दिसत आहे़ जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्यापासून प्रत्यक्षात दुष्काळी परिस्थिती उद्भवण्यास सुरुवात झाली़ त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांतील खरेदी-विक्रीवर परिणाम होईल, असे वाटत होते़ परंतु, परिस्थिती मात्र त्या उलट असल्याचेच दिसत आहे़हिंगोली जिल्ह्यातही वाढला महसूलपरभणी येथील मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत हिंगोली जिल्ह्याचाही कारभार पाहिला जातो़ या जिल्ह्यात नोव्हेंबर २०१७ मध्ये १ हजार २३९ दस्तांची विक्री झाली़ त्यातून १ कोटी ७५ लाख ४० हजार २७० रुपयांचा महसूल जिल्ह्याला मिळाला़ नोव्हेंबर २०१८ मध्ये दस्त विक्री कमी झाली आहे़ १ हजार १०२ मुद्रांक दस्त विक्रीतून १ कोटी ५८ लाख ९२ हजार ६५ रुपयांचा महसूल प्रशासनाला मिळाला़ तर डिसेंबर २०१७ मध्ये १ हजार ५३५ दस्तांची विक्री झाली़ त्यातून १ कोटी ९५ लाख ७८ हजार ३६० रुपयांचा महसूल जमा झाला असून, डिसेंबर २०१८ मध्ये १ हजार ४१२ दस्तांच्या विक्रीतून २ कोटी २५ लाख रुपयांचा महसूल प्रशासनाला उपलब्ध झाला आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीRevenue Departmentमहसूल विभाग