शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : निदर्शने, मोर्चाद्वारे घटनेचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 00:26 IST

संविधानाची प्रत जाळणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करावी, या मागणीसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. भीम आर्मी संघटना आणि रिपब्लिक सेनेच्या वतीने केलेल्या आंदोलनात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : संविधानाची प्रत जाळणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करावी, या मागणीसाठी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. भीम आर्मी संघटना आणि रिपब्लिक सेनेच्या वतीने केलेल्या आंदोलनात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर ९ आॅगस्ट रोजी संविधानाची प्रत जाळून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करुन संपूर्ण भारतीयांचा अवमान केला. या प्रकरणी देश विघातक कृत्य करणाºयांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनानंतर प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर भीम आर्मी संघटनेचे जिल्हाप्रमुख कचरु गोडबोले, चंद्रकांत जोंधळे, प्रशांत ढगे, सुधाकर वाघमारे, विनोद जोंधळे, बुद्धपाल कांबळे, धम्मदीप मोगले, प्रमोद जोंधळे, मंगेश मस्के आदींची नावे आहेत.रिपब्लिकन सेनारिपब्लिकन सेनेनेही याच मागणीसाठी आंदोलन केले. त्यानंतर जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर जिल्हाप्रमुख महेंद्र सानके, सुधाकर वाघमारे, अच्युतराव घुगे, बाबासाहेब हारबडे, चंद्रकांत लहाने, रमेश भिंगारे, शरद एडके, सुभाष गायकवाड, महेश घुगे, तुकाराम मुंढे आदींची नावे आहेत.संविधानप्रेमी नागरिकांनी सेलूत काढला मोर्चासेलू- भारतीय राज्यघटनेच्या प्रती जाळणाºया आरोपींविरूद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत संविधानप्रेमी नागरिकांनी शहरातील प्रमुख मार्गावरून शनिवारी मोर्चा काढला़ मोर्चानंतर उपविभागीय अधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिल्ली येथील जंतर मंतर मैदानावर युथ ई क्वॉलिटी फाऊंडेशन व काही देशद्रोही संघटनांच्या पदाधिकाºयांनी भारतीय संविधानाच्या प्रती जाळल्या़ तसेच घटनेचे शिल्पकार डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली़ हा प्रकार संतापजनक असून, आंतरराष्ट्रीयस्तरावर मानहानी करणारा आहे़ या प्रकरणी आरोपींविरूद्ध राष्ट्रद्रोह तसेच रासुका अंतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली़ यावेळी अ‍ॅड़विष्णू ढोले, मिलिंद सावंत, अशोक अंभोरे, विलास कांबळे, मोहन समिंद्रे, अ‍ॅड़हर्षवर्धन सोनकांबळे, बापू धापसे, आनंद साळवे, संजय भाग्यवंत, गौतम कनकुटे, अशोक पाईकराव, गौतम साळवे, शेख खलील, प्रदीप धापसे आदींसह संविधानप्रेमी नागरिक उपस्थित होते़

टॅग्स :parabhaniपरभणीParabhani collector officeजिल्हाधिकारी कार्यालय परभणीJantar Mantarजंतर मंतरdelhiदिल्ली