शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

परभणी : सौर कृषीपंप योजनेत २१ शेतकऱ्यांचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:00 AM

मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेतून कृषीपंपाकरीता वीज जोडणी घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून सात दिवसांत जिल्ह्यातील २१ शेतकºयांनी सौर कृषीपंपासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेतून कृषीपंपाकरीता वीज जोडणी घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून सात दिवसांत जिल्ह्यातील २१ शेतकºयांनी सौर कृषीपंपासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत.परभणी जिल्हा हा सुपिक जमिनीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. दरवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यामध्ये ५ लाख २१ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होते. जवळपास ३ लाख शेतकरी जिल्ह्यात आहेत. या शेतकºयांपैकी ९२ हजार शेतकºयांनी वीज वितरण कंपनीकडे विहित नमुन्यात प्रस्ताव दाखल केले आहेत; परंतु, वीज वितरण कंपनीकडून कृषीपंपधारक शेतकºयांना वीजपुरवठा करताना काटकसर केली जाते. कधी वीज गळतीचे कारण पुढे केले जाते. तर कधी वीज बिलाची थकबाकी असल्याचे सांगितले जाते. महावितरणच्या या प्रशासकीय घोळामध्ये कृषीपंपधारकांना ऐनवेळी वीजपुरवठा उपलब्ध होत नाही. परिणामी शेतकºयांची पिके पाण्याअभावी हातची जातात. हा आजपर्यंतचा अनुभव आहे.या सर्व प्रकारावर तोडगा काढण्यासाठी व शेतकºयांसाठी वरदान ठरणारी व शाश्वत विजेचे स्वप्न सत्यात साकारण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना अंमलात आणली. ही योजना तीन वर्षे चालणार असून या योजनेत लाभार्थी शेतकºयाला तीनही वर्षापर्यंत महावितणच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या स्वतंत्र पोर्टलच्या माध्यमातून प्रस्ताव दाखल करता येणार आहेत. १५ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेत जिल्ह्यातील २१ शेतकºयांनी प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यामुळे येत्या काळात या योजनेतील प्रस्तावांची संख्या वाढणार आहे.नांदेड परिमंडळात ७८ शेतकºयांचा समावेशनांदेड परिमंडळातील ७८ शेतकºयांनी सात दिवसांत सौर कृषीपंपाच्या जोडणीसाठी अर्ज केले आहेत. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील १८, परभणी जिल्ह्यातील २१ तर सर्वाधिक हिंगोली जिल्ह्यातील ३९ शेतकºयांचा समावेश आहे. यामध्ये खुल्या प्रवर्गातून ६४ तर अनुसूचित जातीतील १० तसेच अनुसूचित जमातीतील ४ शेतकºयांचा समावेश आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीChief Ministerमुख्यमंत्री