शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

परभणी : दारू कारखान्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:04 IST

शहरातील मराठवाडा प्लॉट भागातील जाकेर हुसेन नगर येथे सुरु असलेल्या बनावट दारु निर्मितीच्या कारखान्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने २४ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास छापा टाकला. यात दीड लाख रुपयांची नामांकित कंपनीची बनावट दारु जप्त करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: शहरातील मराठवाडा प्लॉट भागातील जाकेर हुसेन नगर येथे सुरु असलेल्या बनावट दारु निर्मितीच्या कारखान्यावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने २४ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास छापा टाकला. यात दीड लाख रुपयांची नामांकित कंपनीची बनावट दारु जप्त करण्यात आली आहे.पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक बुधवारी रात्री गस्त घालत असताना या बनावट दारुच्या कारखान्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला असता मॅकडॉल व्हिस्कीच्या ४५३ बाटल्या, बनवाट दारु भरण्यासाठी असलेल्या मॅकडॉल कंपनीच्या १२३० बाटल्या, इंम्पेरियल ब्लू कंपनीच्या १७५, रॉयल स्टॅग कंपनीच्या १६०, आॅफीसर चॉईस कंपनीच्या २०, रियल कंपनीच्या ७ रिकाम्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच रिकाम्या बाटल्यांमध्ये दारु सील करण्यासाठी वापरण्यात येत असलेले ६ कटर, एक आरापट्टी, स्क्रु ड्रायव्हर, ब्रश, बनावट दारुच्या बाटल्या सील करण्यासाठी विविध कंपन्यांचे १२३० सील, झाकणे, बॉक्स तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले कागदी पुठ्ठे, एक विना क्रमांकाची दुचाकी, मोबाईल आदी साठा पोलिसांनी जप्त केला आहे.या प्रकरणी शेख जफर शेख जमीर, किशन सुरेश गायकवाड, शफू, सनी महाराज या चौघांविरुद्ध नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्राहकांची फसवणूक करुन बेकायदेशीररित्या कारखान्यात दारुचा साठा केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.पोलिसांनी या संपूर्ण कारवाईमध्ये १ लाख ५७ हजार ६५ रुपयांची बनावट दारु जप्त केली आहे. या कारवाईमुळे अवैध दारु विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.दारुच्या रिकाम्या बाटल्या, कंपन्यांचे लेबल असलेले झाकणं आणि सीलच्या सहाय्याने बनावट दारु कंपनीच्या नावाने तयार करण्याचा गंभीर प्रकार पोलिसांच्या कारवाईनंतर समोर आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक हनुमान पांचाळ, हनुमान कच्छवे, सखाराम टेकुळे, जगदीश रेड्डी, घनसावंत, कांदे, पूजा भोरगे, मुंडे यांच्या पथकाने केली.ड्राय डे मुळे केला होता साठाप्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी जिल्ह्यात ड्राय डेचे आदेश काढले जातात. या काळामध्ये दारुची दुकाने बंद ठेवण्यात येतात. या ड्राय डेचा फायदा उठविण्यासाठी परभणीतील या बनावट दारुच्या कारखान्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारुचा साठा करुन ठेवला होता. ड्राय डे च्या दिवशी जिल्ह्यातील वेगवेगळ्या ढाब्यांवर ही दारु पोहचती करण्याचेही नियोजन आरोपींनी केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. विविध नामांकित कंपन्यांची बनावट दारु जप्त केल्याने अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत.५

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसliquor banदारूबंदी