शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

परभणी : कालवा दुरुस्तीला धोरणांचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2019 11:59 PM

जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने थेट निधी बंद केला असून वसुलीच्या रक्कमेतून दुरुस्तीची कामे केली जात असल्याने त्याचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जायकवाडी पाटबंधारे विभागाच्या कालव्यांच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने थेट निधी बंद केला असून वसुलीच्या रक्कमेतून दुरुस्तीची कामे केली जात असल्याने त्याचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.परभणी जिल्ह्यातील पाथरी, गंगाखेड, परभणी, पूर्णा या तालुक्यांमध्ये जायकवाडी प्रकल्पाचा डावा कालवा प्रवाही आहे. पाथरी तालुक्यातील वरखेड येथून या कालव्याला सुरुवात झाली असून मुख्य कालवा, वितरिका, उपवितरिकांच्या माध्यमातून डाव्या कालव्यावर साधारणत: ९० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. त्याचप्रमाणे या प्रकल्पाचा उजवा कालवाही सोनपेठ, गंगाखेड या भागातून जात असल्याने उजव्या कालव्याच्या माध्यमातूनही सिंचन होते.खरीप हंगामामध्ये मान्सूनच्या पावसावर पिके घेतली जातात. तर रबी हंगामात डाव्या कालव्यातून सोडलेल्या पाण्यावर या भागातील शेती सिंचनाखाली आली आहे. कालव्याच्या देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी स्थानिक पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाकडे आहे. दरवर्षी दुरुस्तीसाठी पाटबंधारे विभागाकडून निधी उपलब्ध होत असे. त्यामुळे दुरुस्तीची कामेही वेळेत पूर्ण केली जात होती; परंतु, मागील काही वर्षापासून दुरुस्तीसाठी येणारा निधी बंद करण्यात आला आहे. पाणीपट्टी वसुलीतून जमा होणाºया रक्कमेतूनच दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध केला जातो. मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात सातत्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याने त्याचा परिणाम वसुलीवर होत आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी निधी मिळणेही दुरापास्त झाले आहे. कालव्यांची नियमित दुरुस्ती होत नसल्याने सिंचनासाठी सोडलेले पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहचत नाही. परिणामी पाणी सोडूनही शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नसल्याची स्थिती आहे. तेव्हा कालवा दुरुस्तीसाठी राज्य शासनाने पूर्वीप्रमाणेच निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी आता होत आहे.तीन वेळा दिले जाते पाणी४जायकवाडी प्रकल्पातून परभणी जिल्ह्यासाठी खरीप, रबी आणि उन्हाळी अशा तीन सत्रांमध्ये पाणी पाळी दिली जाते. कालव्याला पाणी सोडण्यापूर्वी लाभक्षेत्रातील शेतकºयांकडून पाणी मागणी अर्ज मागविले जातात.४पीकनिहाय आणि हेक्टरनिहाय त्यावर पाणीपट्टी आकारारुन त्याची वसुली केली जाते. मात्र या वसुलीला थंड प्रतिसाद मिळत आहे. परिणामी दुरुस्तीची कामे करताना अडचणी निर्माण होत आहेत.नगरपालिकांकडे थकली रक्कम४जायकवाडी प्रकल्पातून नगरपालिकांना पिण्यासाठीही पाणी दिले जाते. त्यामध्ये पाथरी, मानवत आणि गंगाखेड नगरपालिकांना पाटबंधारे विभागामार्फत पिण्यासाठी पाणी पुरविण्यात आले. मात्र या पालिकांकडेही पाण्याची रक्कम थकित आहे. उपलब्ध माहितीनुसार गंगाखेड नगरपालिकेकडे ६० ते ७० लाख रुपये.४ पाथरी नगरपालिकेकडे जवळपास ८० लाख रुपये आणि मानवत नगरपालिकेकडे साधारणत: ७० लाख रुपयांची थकबाकी आहे. पालिकांकडून चालू पाणीपट्टी भरली जात असली तरी जुनी थकबाकी दिली जात नसल्याने थकबाकीचा डोंगर वाढत चालला आहे.परळीच्या थर्मलचा आधार४पिण्याच्या पाण्याबरोबरच जायकवाडी प्रकल्पाचे पाणी व्यावसायिक तत्वावरही दिले जाते. परभणी येथील पाटबंधारे विभागातून परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रासाठी कालव्याच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे औष्णिक विद्युत केंद्राकडून साधारणत: २४ कोटी रुपयांची वसुली कार्यालयास प्राप्त होते. या वसुलीच्या आधारावरच कार्यालयीन कर्मचाºयांचे पगार, कार्यालयीन खर्च आणि दुरुस्तीच्या कामाची भिस्त अवलंबून आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीState Governmentराज्य सरकारfundsनिधीWaterपाणी