शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पोलिसांची निवासस्थाने झाली असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:39 IST

तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा भार स्वत:च्या शिरावर घेणाऱ्या पोलिसांच्या कुटुंंबियांना मात्र असुरक्षित जागेत वास्तव्य करावे लागत आहे. शहरातील पोलीस वसाहतीमधील निवासस्थानांची दुरवस्था झाली असून हे कुटुंबिय जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत असताना निवासस्थानांच्या दुरुस्तीकडे मात्र पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा भार स्वत:च्या शिरावर घेणाऱ्या पोलिसांच्या कुटुंंबियांना मात्र असुरक्षित जागेत वास्तव्य करावे लागत आहे. शहरातील पोलीस वसाहतीमधील निवासस्थानांची दुरवस्था झाली असून हे कुटुंबिय जीव मुठीत घेऊन वास्तव्य करीत असताना निवासस्थानांच्या दुरुस्तीकडे मात्र पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.उन्हाळा असो की पावसाळा; कशाचीही तमा न बाळगता २४ तास कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कुटुंबापासून दूर राहत डोळ्यात तेल घालून रात्रं-दिवस कर्तव्य बजावणाºया पोलीस कर्मचाºयांचे कुटुंबिय मात्र असुरक्षित छताखाली राहत आहेत. गंगाखेड पोलीस ठाण्यांतर्गत कार्यरत पोलीस कर्मचाºयांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळ ३० वर्षांपूर्वी वसाहत निर्माण करण्यात आली; परंतु, या वसाहतीची नियमित दुरुस्ती झाली नसल्याने सध्या निवासस्थांची दुरवस्था झाली आहे.घरांच्या छताला गळती लागली असून फरशी ठिकठिकाणी उखडली आहे. खिडक्यांची तावदाने, घरांवरील पत्रे तुटल्याने पावसाळ्यात या घरांमध्ये गुडघ्याएवढे पाणी साचते. सांडपाणी वाहूून नेणाºया नाल्या मागील अनेक महिन्यांपासून बंद असल्याने घरासमोरच पाणी साचते. परिणामी पावसाळ्यामध्ये घराच्या बाहेर पडणे अवघड होते. तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा सांभाळणाºया पोलीस कर्मचाºयांच्या कुटुंबियांना मात्र सुरक्षेसाठी पत्र्याच्या शेडचा आधार घ्यावा लागत आहे. ड्रेनेजची सुविधा नसल्याने सांडपाणी वसाहतीमध्ये तुंबून राहते. हेच पाणी जलवाहिनीतही मिसळते. त्यामुळे पोलीस वसाहतीत राहणाºया कर्र्मचाºयांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.संरक्षक भिंत कोसळलीया वसाहतीला चारही बाजूंनी संरक्षित भिंत बांधली आहे. शनिवार बाजार परिसरात ही संरक्षक भिंत कोसळली आहे. तर वसाहतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावलेले फाटक तुटल्याने मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. तसेच बाजारासाठी आलेले नागरिक या भागात अस्वच्छता करतात. संरक्षित भिंत बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला; परंतु, उपयोग झाला नाही. त्यामुळे कर्मचाºयांनी स्वखर्र्चाने लोखंडी फाटक बसवून घेतले आहे. भिंत कोसळलेल्या भागात तात्पुरती डागडुजी करण्यात आली. संरक्षक भिंत बांधून देण्यासाठी पोलीस प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही बांंधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीPoliceपोलिसHomeघर