शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत पोलिसांचे तीन ठिकाणी अवैध दारू विक्रीवर धाडसत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 14:18 IST

परभणी पोलीस दलातील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने आज पहाटे शहरात तीन ठिकाणी छापे टाकले

परभणी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर परभणी पोलीस दलातील स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने आज पहाटे शहरात तीन ठिकाणी छापे टाकून ७९ हजार रुपयांची अवैध देशी आणि विदेशी दारू पकडली आहे. एकूण १० आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, या कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात अवैध दारू विक्रीतून कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होऊ शकते. त्यामुळे पोलिसांनी जिल्ह्यात धाडसत्र सुरू केले आहे. श्री गणरायाच्या आगमनाच्या दिवशीच पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. १३ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजेपासून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे आणि त्यांच्या पथकाने शहरात तीन ठिकाणी छापे मारले. पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.

शहरातील मराठवाडा प्लॉट, उस्मानिया कॉलनी,वांगी रोड वरील हडको परिसर आदी ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. मराठवाडा प्लॉट भागात देशी दारू पकडण्यात आली असून, उस्मानिया कॉलनी परिसरात विदेशी दारू आणि हडको परिसरात बिअरची अवैध विक्री होत असताना कारवाई करण्यात आली. या तीनही छाप्यांमध्ये देशी दारूच्या ९५८ बाटल्या, विदेशी दारूच्या ६५ बाटल्या आणि बिअरच्या ४८ बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. विशेष म्हणजे या कारवाईत १० आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यात तीन महिलांचा समावेश आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. या धाडसत्रामुळे परभणी शहरात अवैध देशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीraidधाडPoliceपोलिस