शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : ३ हजार रुपयांची लाच घेताना पत्नीसह पोलीस पाटील ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 00:38 IST

संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अनुदान मिळवून देण्याच्या मागणीसाठी ३ हजार रुपयांची पत्नीकरवी लाच स्वीकारताना पोहंडूळ येथील पोलीस पाटलास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता ताब्यात घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी) : संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अनुदान मिळवून देण्याच्या मागणीसाठी ३ हजार रुपयांची पत्नीकरवी लाच स्वीकारताना पोहंडूळ येथील पोलीस पाटलास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता ताब्यात घेतले.याबाबत सविस्तर माहिती अशी- मानवत तालुक्यातील पोहंडूळ येथील एका शेतकऱ्याला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी व या संदर्भातील प्रस्ताव मंजूर करण्यासाठी पोलीस पाटील लक्ष्मण उत्तमराव कोप्रटकर यांनी ३ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली असल्याची तक्रार परभणी येथील कार्यालयात सदरील शेतकºयाने केली होती. त्यानंतर या कार्यालयाच्या वतीने तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानुसार ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पोहंडूळ येथे सापळा लावण्यात आला. यावेळी तक्रारकर्त्याकडून ३ हजार रुपयांची लाच पोलीस पाटील लक्ष्मण कोप्रटकर हे त्यांच्या पत्नी शारदा लक्ष्मण कोप्रटकर यांच्यामार्फत घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत चालू होती. ही कावाई पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक भारत हुंबे, पोनि.भूजंग गोडबोले, अमोल कडू, हनुमंत कटारे, मुक्तार शेख, सचिन धबडगे, चौधरी यांच्या पथकाने केली.करम येथे विद्यार्थिनीची आत्महत्या४सोनपेठ- तालुक्यातील करम येथे एका १८ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ११ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. परळी तालुक्यातील इंदपवाडी येथील पल्लवी जंगले (१८) ही विद्यार्थिनी आई व भावासह करम येथे राहत होती. ती सोनपेठ येथील आयटीआयमध्ये शिक्षण घेत होती. ११ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पल्लवी माणिक जंगले हिने घरातील लोखंडाच्या आडूला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत दशरथ मोरे यांनी दिलेल्या माहितीवरुन सोनपेठ पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल४गंगाखेड- परळी रोडवरील वैतागवाडी पाटी जवळ दुचाकी चालकास धडक देऊन मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पीकअप चालकाविरुद्ध गंगाखेड ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गंगाखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन गावाकडे परतणाºया दाम्पत्याच्या एम.एच.२२- एक्यू ७५२३ क्रमांकाच्या दुचाकीला १० फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास अज्ञात पीकअप चालकाने पाठीमागून जोराची धडक दिली होती.४या अपघातात दुचाकीवरील चंदाबाई सार्थक बचाटे (२०) यांचा मृत्यू झाला होता. तर त्यांचे पती सार्थक संजय बचाटे हे जखमी झाले होते. याबाबत मंगळवारी सायंकाळी ७ वाजता सार्थक बचाटे यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात पीकअप चालकाविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी राजेश राठोड करीत आहेत.

टॅग्स :parabhaniपरभणीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCrime Newsगुन्हेगारी