शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पोलिसांनी जुळविले विस्कटलेले संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:33 IST

दैनंदिन जीवनात छोट्या-मोठ्या कुरबुरीतून पती-पत्नींमध्ये दुरावा निर्माण होऊन विस्कटण्याच्या मार्गावर असलेले ७० संसार पुन्हा जुळवण्याची कामगिरी जिल्हा पोलीस दलातील महिला तक्रार निवारण केंद्राने केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : दैनंदिन जीवनात छोट्या-मोठ्या कुरबुरीतून पती-पत्नींमध्ये दुरावा निर्माण होऊन विस्कटण्याच्या मार्गावर असलेले ७० संसार पुन्हा जुळवण्याची कामगिरी जिल्हा पोलीस दलातील महिला तक्रार निवारण केंद्राने केली आहे.पती-पत्नींमध्ये झालेल्या वादातून अथवा अन्य कारणांवरुन वाद निर्माण होऊन सासरच्या मंडळीविरुद्ध महिलांच्या तक्रारी दाखल होतात. यातून अनेक वर्षापासून सुरु असलेला सुखी संसार मोडतो. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये दररोज अशा प्रकारच्या तक्रारी दाखल होतात. या प्रकरणांमध्ये थेट गुन्हा दाखल करणे हा पर्याय नसून त्यात सामोचारानेही मार्ग काढता येऊ शकतो, या भावनेने पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा महिला तक्रार निवारण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.पोलीस ठाण्यांमध्ये अशा प्रकारची तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलांना प्रारंभी महिला तक्रार निवारण केंद्रात पाठविले जाते. या केंद्रातील अधिकारी व कर्मचारी महिलेच्या तक्रारीतील तथ्य जाणून घेतात. त्यानंतर या प्रकरणात तडजोड करण्याचे प्रयत्न केले जातात. दोन्ही पक्षकारांना समोर बसवून त्यांच्यात समेट घडवून आणला जातो. यातून अनेक वेळा तक्रारकर्त्यांच्या शंकांचे निरसण होऊन संसार पुन्हा सुरळीत होतो.१ जानेवारी ते १४ जुलैपर्यंत महिला तक्रार निवारण केंद्रात दाखल झालेल्या प्रकरणांपैकी ७० प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड करण्यात पोलीस प्रशासनाला यश आले आहे. या ७० ही प्रकरणातील पती-पत्नी आता गुण्यागोविंदाने नांदत आहेत. त्यामुळे ७ महिन्यांच्या काळात विस्कटलेले ७० संसार पुन्हा जुळविण्याची कामगिरी या केंद्राने केली आहे.महिला तक्रार निवारण केंद्राच्या पोलीस उपनिरीक्षक गोपी सोनेत, पोलीस नाईक उमा पाटील, शकुंतला एकाडे, अर्चना रेड्डी, सीमा चाटे, आम्रपाली मुजमुले या कर्मचाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले.पीडित महिलांनी पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करण्यापूर्वी जिल्हा पोलीस दलातील महिला तक्रार निवारण केंद्राशी संपर्क साधावा. गुन्हा दाखल करण्यापेक्षा सामोपचारातून प्रकरण मिटवून घ्यावे, असे आवाहन महिला तक्रार निवारण केंद्राने केले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFamilyपरिवारPoliceपोलिस