शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

परभणी :अडथळा ठरणाऱ्या ६० गाड्या पोलिसांनी उचलल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 00:25 IST

वाहतुकीला अडथळा ठरणारी ६० दुचाकी वाहने टोर्इंग व्हॅनच्या सहाय्याने उचलून या वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. शहर वाहतूक शाखेने सोमवारी दिवसभरात केलेल्या या कारवाईने वाहनधारकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : वाहतुकीला अडथळा ठरणारी ६० दुचाकी वाहने टोर्इंग व्हॅनच्या सहाय्याने उचलून या वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. शहर वाहतूक शाखेने सोमवारी दिवसभरात केलेल्या या कारवाईने वाहनधारकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.परभणी शहर वाहतूक शाखेचा पदभार स्वीकारल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी वाहतुकीला शिस्त लावण्याच्या उद्देशाने उपाययोजना सुरु केली आहे. चार दिवसांपासून शहरात टोर्इंग व्हॅनच्या सहाय्याने वाहने उचलून थेट पोलीस चौकीत लावली जात आहेत. या वाहनधारकांकडून रितसर दंड वसूल केल्यानंतर ही वाहने संबंधितांच्या ताब्यात दिली जात आहेत. सोमवारी देखील ही धडक मोहीम राबविण्यात आली.सोमवारी परभणी शहरातील स्टेशनरोड, किंग कॉर्नर, जिंतूररोड आणि वसमतरोडवर ही मोहीम राबविण्यात आली. दिवसभरात ६० दुचाकी वाहने टोर्इंग व्हॅनच्या सहाय्याने उचलून शहर वाहतूक शाखेत लावण्यात आले. या वाहनधारकांकडून प्रत्येकी ३०० रुपये या प्रमाणे १८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. स्टेशनरोड वरील विसावा कॉर्नर भागात स्टेट बँक इंडियाच्या मुख्य शाखेत येणाºया ग्राहकांची वाहने नेहमीच रस्त्यावर उभी असतात. पोलिसांनी सोमवारी येथील वाहनेही उचलून कारवाई केली.कर्मचाºयांची झाली धावपळजिल्हाधिकारी कार्यालयात वाहतूक शाखेच्या पथकाने अचानक कारवाई करीत वाहने उचलली व दंड वसूल केल्याने कार्यालयातील कर्मचाºयांची चांगलीच धावपळ उडाली. कोणतीही पूर्व सूचना न देता कारवाई करण्यात आली. चारचाकी वाहनांवर मात्र कारवाई झाली नाही. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पार्किंगची व्यवस्था निश्चित नाही. पार्किंग सुविधा नसताना कारवाई केल्यामुळे कर्मचाºयांनी नाराजी व्यक्त केली.जिल्हाधिकारी कार्यालयातही उचलली वाहनेवाहतूक शाखेची ही मोहीम शहरातील रस्त्यापर्यंत मर्यादित राहिली नाही. सोमवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास वाहतूक शाखेचे पथक टोर्इंग व्हॅनसह जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उभी असलेली वाहने टोर्इंग व्हॅनमध्ये टाकून नेण्यात आली. ११ वाहने वाहतूक शाखेच्या कार्यालयात लावण्यात आली. तर इतर वाहनधारकांना जागीच प्रत्येकी ३०० रुपये या प्रमाणे दंड लावण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नो पार्किंगच्या जागेवरच सर्रास वाहने उभी केली जातात. यात कार्यालयातील कर्मचाºयांसह बाहेरहून येणाºया नागरिकांच्या वाहनांचाही समावेश असतो. सोमवारच्या कारवाईत ही सर्व वाहने उचलण्यात आली.जिल्हाधिकाºयांचे आदेशजिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नो पार्किंगच्या जागेवर उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिल्या आहेत. त्यांच्या सूचनेनुसारच ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी दिली.

टॅग्स :parabhaniपरभणीtraffic policeवाहतूक पोलीसtwo wheelerटू व्हीलर