शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : अडीच तास उशिराने धावली पंढरपूर रेल्वे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 00:34 IST

निजामाबाद-पंढरपूर ही सवारी रेल्वेगाडी रविवारी तब्बल अडीच तासाने परभणी स्थानकावर पोहचल्याने पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांची गैरसोय झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : निजामाबाद-पंढरपूर ही सवारी रेल्वेगाडी रविवारी तब्बल अडीच तासाने परभणी स्थानकावर पोहचल्याने पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांची गैरसोय झाली.१९ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असून या दिवशी पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीचा सोहळा साजरा केला जातो. यासाठी परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यातून हजारो भाविक पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. परभणी रेल्वेस्थानकावरुन पंढरपूला जाणाºया भाविकांची संख्या वाढली असल्याचे पहावयास मिळाली. कार्तिकी एकादशीनिमित्त विशेष रेल्वेगाड्या सोडण्याची मागणी रेल्वे प्रवासी महासंघाने केली होती. या मागणीची दखल घेत एक विशेष गाडीही रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास पंढरपूरकडे रवाना झाली.पंढरपूरला जाण्यासाठी नियोजित निजामाबाद-पंढरपूर ही रेल्वेगाडी असल्याने या रेल्वेगाडीचे नियोजन करीत जिल्हाभरातील अनेक भाविक परभणीच्या स्थानकावर दाखल झाले होते. दररोज ६.२० वाजता परभणी रेल्वेस्थानकावर येणारी ही रेल्वेगाडी रविवारी मात्र ८.३० वाजेपर्यंत स्थानकावर आली नाही. ८.४१ मिनिटांनी पंढरपूर गाडी स्थानकावर पोहचली. त्यामुळे पंढरपूरकडे जाणाºया भाविकांना तब्बल अडीच तास रेल्वेची प्रतीक्षा करीत स्थानकावर ताटकळत थांबावे लागले.सायंकाळी ५ वाजेपासूनच स्थानकावर भाविकांची गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. प्लॅट फॉर्म क्रमांक ३ वर रेल्वेची प्रतीक्षा करत थांबलेले अनेक भाविक पहावयास मिळाले. सायंकाळी ६ वाजेपासून भाविक चौकशी कक्षात पंढरपूरकडे जाणाºया गाडीची विचारणा करीत होते; परंतु, प्रत्येकवेळी ही गाडी उशिरा येईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे भाविकांना अडीच तासांपर्यंत स्थानकावर ताटकळत थांबावे लागले.रात्री ८.३० वाजेच्या सुमारास देवगिरी एक्सप्रेस, पूर्णा पॅसेंजर आणि त्यानंतर पंढरपूर गाडी स्थानकावर दाखल झाली. त्यामुळे स्थानकावर प्रवाशांची गर्दी वाढली असल्याचे दिसून आले.

टॅग्स :parabhaniपरभणीrailwayरेल्वेPandharpurपंढरपूरpassengerप्रवासी