शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

परभणी : वळण रस्त्यासाठी ६७ कोंटीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 00:58 IST

कल्याण- निर्मल या राष्ट्रीय महामार्गासाठी परभणी शहराजवळून १४.५ कि.मी. अंतराचा बाह्यवळण रस्ता प्रस्तावित केला असून या रस्त्याच्या भूसंपादनासाठी ६७ कोटी ६३ लाख १५ हजार ९४७ रुपयांची आवश्यकता आहे. हा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला. परंतु, निधी उपलब्ध नसल्याने भूसंपादनाची कामे ठप्प पडली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कल्याण- निर्मल या राष्ट्रीय महामार्गासाठी परभणी शहराजवळून १४.५ कि.मी. अंतराचा बाह्यवळण रस्ता प्रस्तावित केला असून या रस्त्याच्या भूसंपादनासाठी ६७ कोटी ६३ लाख १५ हजार ९४७ रुपयांची आवश्यकता आहे. हा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला. परंतु, निधी उपलब्ध नसल्याने भूसंपादनाची कामे ठप्प पडली आहेत.कल्याण- निर्मल हा राष्ट्रीय महामार्ग परभणी शहरातून पुढे नांदेडकडे जातो. परभणी शहरातील अरुंद रस्ते आणि वाढलेली वसाहत लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्गाला शहराबाहेरुन बाह्यवळण रस्ता मंजूर करण्यात आला. पाथरी रोडवरील सरस्वती धन्वंतरी डेंटल कॉलेजजवळून निघणारा हा बाह्यवळण रस्ता पुढे असोला पाटी जवळ वसमत रस्त्याला मिळणार आहे. १४.५ कि.मी. अंतराच्या या रस्त्यासाठी सुमारे २०० एकर जमीन संपादित करणे गरजेचे आहे. या जमिनीची मोजणी, शेतकऱ्यांच्या नावासह जमिनीच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. येथील भूसंपादन विभागाने जमीन संपादनासाठीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आहे.शेतकरी निहाय जमिनीचे मूल्यमापन काढून भूसंपादनासाठी लागणाºया रक्कमेचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग नांदेड विभागाकडे पाठविला आहे. ही सर्व जमीन संपादित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला ६७ कोटी ६३ लाख १५ हजार ९४७ रुपयांची आवश्यकता आहे. हा निधी अद्याप उपलब्ध झाला नसल्याने जमीन संपादनाची प्रक्रिया सध्या थांबली आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामालाही सुरुवात झालेली नाही. मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या या रस्त्याच्या कामासाठी जमीन संपादनासाठी लागणारा निधी तत्काळ मंजूर करावा, अशी मागणी होत आहे.ंभूसंपादन विभागाने काढले मूल्यांकनबाह्य वळण रस्त्यासाठी ८४ हेक्टर जमिनीच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण उपजिल्हाधिकारी डॉ.संजय कुंडेटकर यांनी केली आहे. पाचही गावांच्या शिवारातील जमीन संपादनासाठी ६५ कोटी ९८ लाख २० हजार ४३६ रुपये लागणार आहेत. ही प्रक्रिया राबविण्यासाठी अस्थापना खर्च ९८ लाख ९७ हजार ३०७ रूपये, सुविधांसाठी ६५ लाख ९८ हजार २०४ रुपये असे एकूण ६७ कोटी ६३ लाख १५ हजार ९४७ रुपयांची आवश्यकता आहे. ही रक्कम भूसंपादन विभागास प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांना मावेजा वितरित करुन प्रत्यक्ष जमीन शासनाच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. सध्या तरी निधी नसल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाचे काम ठप्प पडले आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीhighwayमहामार्ग