लोकमत न्यूज नेटवर्कसोनपेठ (परभणी) : तालुक्यातील नरवाडी तांडा येथे लागलेल्या आगीत कडबा जळून खाक झाल्याची घटना ६ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली.सोनपेठ तालुक्यातील नरवाडी तांडा येथे अचानक सुटलेल्या वाऱ्यामध्ये भगवान राठोड यांच्या घरावरील पत्रे उडाली. यातील काही पत्रे विद्युत तारांवर जावून आदळली. त्यामुळे विद्युत तारांचे घर्षण होऊन आग लागली.या आगीत देविदास चव्हाण यांच्या ५०० कडब्याच्या पेंढ्या व २०० ज्वारीचे गूड आगीत जळून खाक झाले. त्यामुळे आगीत नुकसान झालेल्या देविदास चव्हाण यांना मदत देण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांमधून होत आहे.
परभणी: नरवाडीत कडबा जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 00:35 IST