शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: स्वच्छ सर्वेक्षणात मनपाची ढिसाळ कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 23:54 IST

केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात गतवर्षी जलद प्रतिसादाबद्दल देश पातळीवर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविणाऱ्या परभणी महानगरपालिकेची यावर्षी अत्यंत सुमार कामगिरी झाली असून, देशातील पश्चिम विभागातील १००२ शहरांच्या यादीत परभणीचे नावच आलेले नाही़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात गतवर्षी जलद प्रतिसादाबद्दल देश पातळीवर प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविणाऱ्या परभणी महानगरपालिकेची यावर्षी अत्यंत सुमार कामगिरी झाली असून, देशातील पश्चिम विभागातील १००२ शहरांच्या यादीत परभणीचे नावच आलेले नाही़केंद्र शासनाने देशभरात नागरी भागासाठी स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविले होते़ ४ ते ३० जानेवारी या काळात केंद्रस्तरीय पथकाने शहरांना भेटी देऊन या अभियानातील कामांची पाहणी करीत गुणांकन केले होते़ बुधवारी दिल्ली येथे देशातील शहरांचे चार विभागात गुणांकन जाहीर करण्यात आले़ यातील पश्चिम विभागातील १००२ शहरांच्या यादीत परभणी शहराचे नावच नाही़ त्यामुळे परभणी महानगरपालिकेची स्वच्छता अभियानातील यावर्षीची कामगिरी सुमार झाल्याची बाब स्पष्ट झाली आहे़ गतवर्षी या अभियानात जलद प्रतिसाद गटात परभणी महानगरपालिकेला देश पातळीवर पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते़त्यामुळे यावर्षी देखील मनपा या अभियानातील कामगिरीत सातत्य ठेवेल, अशी अपेक्षा होती़ परंतु, प्रशासकीय यंत्रणेतील उदासिनता, राजकीय हस्तक्षेप यामुळे मनपाला स्वच्छता अभियानात चांगली कामगिरी करता आली नाही़ परिणामी या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात तपासणी करण्यासाठी आलेल्या पथकाला मनपाचे काम प्रभावित करू शकले नाही़परिणामी बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या निकालातून परभणी गायब झाली आहे़ परभणी महानगरपालिकेने किमान ८० ते ९० टक्के गुण जरी मिळविले असते तरी या यादीत शहराचे नाव आले असते; परंतु, मनपाला जवळपास ५० ते ५५ टक्केच गुण मिळाल्याची माहिती सूत्रांकडून समजली़अनुदान उचलले पण शौचालय बांधकाम नाहीपरभणी महानगरपालिकेने वैयक्तीक शौचालय उभारण्यासाठी अनेक लाभार्थ्यांना अनुदान दिले; परंतु, बऱ्याच लाभार्थ्यांनी वैयक्तीक शौचालयाचे बांधकाम न करताच अनुदानाची रक्कम हडप केली़ ही बाब पथकाच्या निदर्शनास आली़ विशेष म्हणजे मनपातील अधिकारी, पदाधिकाऱ्यांनाही या संदर्भात माहिती असूनही कारवाई झालेली नाही़ लाभार्थ्यांना जी अनुदानाची रक्कम देण्यात आली, त्यातच मुळात गौडबंगाल असल्याची चर्चा मनपा वर्तुळात आहे़ त्यामुळे या प्रकरणी त्रयस्त यंत्रणेकडून चौकशी केल्यास काही राजकीय मोहरे यातून उघडे पडू शकतात़गंगाखेड पालिका देशात ५२ व्या स्थानावरदरम्यान, स्वच्छ सर्वेक्षण अभियानात पश्चिम विभागामधून परभणी जिल्ह्यातून गंगाखेड नगरपालिकेने ५२ वा क्रमांक मिळविला आहे़ सेलू नगरपालिकेने ३१८७़२० गुण घेऊन ६२ वा, पाथरी नगरपालिकेने ३०८६़९५ गुण घेऊन ८२ वा क्रमांक मिळविला आहे़ तर जिंतूर नगरपालिका २८७८़७९ गुण घेऊन १४६ व्या क्रमांकावर आहे़ मानवत नगरपालिका २७२७़५९ गुणांसह २२४ व्या, पालम नगरपंचायत २५०४़४८ गुणांसह ३४६ व्या, पूर्णा नगरपालिका २४५८़८९ गुणांसह ३६९ व्या आणि सोनपेठ नगरपालिका विभागात ४३३ क्रमांकावर आहे़ या नगरपालिकेला २३४९़१० गुण मिळाले आहेत़ पश्चिम विभागातून हा रँक जाहीर करण्यात आला असून, या विभागात राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या पाच राज्यांचा समावेश आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीGarbage Disposal Issueकचरा प्रश्नParbhani Municipal Corporationपरभणी महानगरपालिका