शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

परभणी महापालिका: टंचाई निवारणासाठी पंधरा कोटींचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:13 IST

शहरातील पाणीटंचाई कायमस्वरुपी दूर करण्यासाठी तातडीच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत १५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शहरातील पाणीटंचाई कायमस्वरुपी दूर करण्यासाठी तातडीच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत १५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त रमेश पवार यांनी दिली.शहर पाणीपुरवठा योजने संदर्भात शुक्रवारी महापालिकेत बैठक झाली. यावेळी महापौर मीनाताई वरपूडकर, आयुक्त रमेश पवार, सभागृह नेते भगवान वाघमारे, शहर अभियंता वसीम पठाण आदींची उपस्थिती होती. शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी येलदरी ते धर्मापुरी अशी ५५ कि.मी.ची जलवाहिनी टाकली आहे. यासाठी १ कोटी २५ लाख लिटर क्षमतेचे स्टोरेज बांधण्यात आले आहे. धर्मापुरी परिसरात दोन जलशुद्धीकरण केंद्रातून खाजा कॉलनी येथील जलकुंभात पाणी आणले जाणार आहे. या ठिकाणाहून नवीन जलवाहिनी उड्डाणपूल मार्गे शिवाजी महाराज यांचा पुतळा ते राहाटी बंधाऱ्यापर्यंत १५ कि.मी. अंतराची जलवाहिनी टाकण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी १५ कोटी रुपये खर्च येणार असून दोन दिवसांपूर्वी आयोजित केलेल्या तातडीच्या पाणीपुरवठा योजनेच्या बैठकीत ही माहिती दिली. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन हा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे, अशी माहिती रमेश पवार यांनी दिली. सध्या राहाटी बंधाºयात सिद्धेश्वर धरणातून पाणी घेतले जाते. एका पाणीपाळीसाठी ४ ते ५ घनमीटर पाणी लागते. नवीन प्रस्तावित जलवाहिनी टाकली तर पाण्याचा अपव्यय टळणार असल्याचेही आयुक्त रमेश पवार यांनी सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीWaterपाणीdroughtदुष्काळwater scarcityपाणी टंचाई