शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

परभणी-मुदखेड दुहेरी रेल्वे मार्ग शासन दरबारी बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 23:59 IST

परभणी- मुदखेड या ८१ कि.मी. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामावर तीन वर्षात तब्बल २४४ कोटी रुपयांचा खर्च झाला असताना या रेल्वे मार्गाच्या कामाची महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक पाहणी अहवालात साधी नोंदही घेण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यशासन दरबारी सध्या तरी हा रेल्वे मार्ग बेदखल असल्याचे दिसून येत आहे.

अभिमन्यू कांबळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : परभणी- मुदखेड या ८१ कि.मी. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामावर तीन वर्षात तब्बल २४४ कोटी रुपयांचा खर्च झाला असताना या रेल्वे मार्गाच्या कामाची महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक पाहणी अहवालात साधी नोंदही घेण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्यशासन दरबारी सध्या तरी हा रेल्वे मार्ग बेदखल असल्याचे दिसून येत आहे.राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास १७ जूनपासून सुरुवात झाली आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी राज्याचा २०१८-१९ चा आर्थिक पाहणी अहवाल जाहीर करण्यात आला. या अहवालामध्ये राज्यात सुरु असलेल्या रेल्वे कामांची सद्यस्थिती दर्शविणारी माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये राज्यातील ९ प्रमुख रेल्वेमार्गांच्या प्रकल्पाची एकूण किंमत व झालेल्या कामाची भौतिक प्रगती याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या माहितीमध्ये परभणी- मुदखेड या ८१ कि.मी.च्या रेल्वे मार्गाची माहितीच देण्यात आली नाही. २०१२-१३ या वर्षात या रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी देण्यात आली. यासाठीचा अंदाजित ३९० कोटी ६० लाख रुपयांचा खर्च होता. गेल्या तीन वर्षात यापैकी २४४ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून एप्रिल ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत ५५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. परभणी ते मिरखेल या १७ कि.मी. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम जून २०१७ मध्ये पूर्ण झाले असून या रेल्वेमार्गाचा वापर सुरु झाला आहे. याशिवाय नांदेड जिल्ह्यातील मुगट ते मुदखेड ९.३ कि.मी. व लिंबगाव-नांदेड- मालटेकडी या १४.१० रेल्वे मार्गाचेही दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. एकूणच परभणी ते मिरखेल या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम वेगाने पूर्ण झाल्यास त्याचा या भागाला मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे या दुहेरीकरणाच्या कामाला गती मिळणे आवश्यक असताना दक्षिणमध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. परभणी-पूर्णा मार्गावरील पूर्णा नदीवरील रेल्वे पुलाचे काम मंद गतीने सुरु असून हे काम पूर्ण होण्यास आणखी ६ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तर लिंबगाव येथील भुयारी रेल्वेमार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. जमीन अधिग्रहण प्रक्रियेमुळे हे काम रखडण्याची शक्यता आहे. या कामासंदर्भात मराठवाड्यातील काही लोकप्रतिनिधींकडून पाठपुरावा होत असला तरी दक्षिण मध्य रेल्वेचे सिकंदराबाद येथील अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. परिणामी या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम कधी पूर्ण होईल, हे ही अनिश्चित आहे. राज्य शासनाच्या आर्थिक पाहणी अहवालात या रेल्वे मार्गाची नोंद झाल्यास त्यावर चर्चा होईल आणि कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु, याबाबत राज्य शासनालाच गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासन दरबारी हा रेल्वेमार्ग का बेदखल करण्यात आला आहे, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.गतवर्षीच्या अहवालातीलच माहिती केली कॉपी-पेस्ट४राज्याच्या २०१८-१९ च्या आर्थिक पाहणी अहवालात राज्यात सुरु असलेल्या रेल्वे कामांची सद्यस्थिती दर्शविणारी माहिती दिली आहे. त्यात एकूण ९ कामांचा समावेश असून एकूण रेल्वेमार्गाची लांबी, प्रकल्पाची किंमत, कामाची भौतिक प्रगती (टक्के) या बाबींचा उल्लेख आहे. विशेष म्हणजे २०१७-१८ च्या अहवालात जी माहिती देण्यात आली होती. तीच माहिती २०१८-१९ च्या १७ जून रोजी जाहीर करण्यात आलेल्या अहवालात जशाच तशी कॉपी करुन देण्यात आली आहे.४त्या आकडेवारीमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल झालेला दिसून येत नाही. त्यामुळे हा अहवाल सादर करताना अधिकाऱ्यांकडून किती गांभीर्य बाळगले जाते, याचाही नमुना यानिमित्ताने समोर आला आहे. जर २०१८-१९ चा अहवाल खरा धरला तर मग गेल्या वर्षभरात नऊही रेल्वे मार्गावर काहीच काम झाले नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.सलग तीन वर्षांपासून नोंदच नाही४राज्य शासनाच्या २०१६-१७, २०१७-१८ व २०१८-१९ या तिन्ही आर्थिक अहवालामध्ये परभणी- मुदखेड या ८१ कि.मी. रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरण कामाची नोंदच घेण्यात आली नाही.४ त्यामुळे या कामाची भौतिक प्रगती किती होत आहे, याची अधिकृत माहितीच शासन दरबारी नोंदविली जात नाही. परिणामी कामाला गती देण्याच्या अनुषंगाने चर्चाही होत नाही.

टॅग्स :parabhaniपरभणीrailwayरेल्वेGovernmentसरकार