शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

परभणी : तीस लाख फॉलोअर्सचा ताईत बनला मोहसीन खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 22:36 IST

‘सरारारा-पीरीरीरी’ म्हटलं की मोहसीन खान अशी ओळख आता टिक टॉकमध्ये रुढ झाली आहे. ८ वर्षांच्या बालकांपासून ते ५० वर्षाच्या नागरिकांपर्यंत मोहसीन खान याला ओळखू लागले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ‘सरारारा-पीरीरीरी’ म्हटलं की मोहसीन खान अशी ओळख आता टिक टॉकमध्ये रुढ झाली आहे. ८ वर्षांच्या बालकांपासून ते ५० वर्षाच्या नागरिकांपर्यंत मोहसीन खान याला ओळखू लागले आहेत. टिक टॉक व्हिडिओ तयार करुन आपल्या वेगळ्या बोली भाषेतील अदाकारीने आणि विशिष्ट अशा लयीने सुमारे ३० लाख फॉलोअर्स तयार करणाऱ्या मोहसीन खान याने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.टिक टॉक या सोशल मीडियावर आता बच्चे कंपनीपासून ते युवक- युवती आणि सर्वच स्तरातील नागरिक युजर्स आहेत. स्वत:चे व्हिडिओ तयार करुन ते या मीडियावर अपलोड करता येतात. असे अनेक व्हिडिओ अपलोड होत असले तरी त्यातही मोहसीन खान या २२ वर्षीय युवकाने आपले वेगळेपण जपले आहे. विशिष्ट लकब आणि दोन मिनिटांच्या छोट्या व्हिडिओत चुटकुल्यांच्या माध्यमातून मनोरंजन करीत समाजातील प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचे काम मोहसीन खान याने केले आहे. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यातच ३० लाख फॉलोअर्स त्याने कमावले असून आतापर्यंत त्याने १ हजार ५०० व्हिडिओ अपलोड केले आहेत. या व्हिडिओंना ९३ मिलियन (९ कोटी ३० लाख) लाईक्स् आतापर्यंत मिळाल्या आहेत. विशेष म्हणजे मोहसीन खानच्या आवाजाचे ड्युट (आवाज वापरुन) काही अभिनेत्यांनीही स्वत:चे व्हिडिओ बनविले आहेत. या प्रसिद्धीमुळे मोहसीन खान याला ठिकठिकाणी निमंत्रणे मिळत असली तरी आर्थिक परिस्थितीमुळे अनेक कार्यक्रमांना तो उपस्थित राहू शकत नाही; परंतु त्याला लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वच टिक टॉक प्रेमी ओळखू लागले आहेत.कोण आहे मोहसीन खान ?४परभणी शहरातील दर्गारोड भागात मास्टर कॉलनीमध्ये रहिवासी असलेला मोहसीन खान महेमूद खान हा युवक मजुरी करतो. मिस्त्री काम करुन कुटुंबाच्या उदरनिर्वाहात हातभार लावणाºया मोहसीन खानची प्रसिद्धी वाढत असल्याने त्याला त्याचे काम करतानाही अडचणी निर्माण होत आहेत. तो ज्या ठिकाणी जाईल, त्या ठिकाणी युवक त्याचा पाठलाग करतात, त्याच्या सोबत सेल्फी घेतात. युवकांना त्याच्याशी बोलतानाही अप्रूप वाटते. त्यामुळे त्याच्या मूळ कामावरही परिणाम होऊ लागला आहे.स्वत:चा आवाज आणि स्वत:चा व्हिडिओ४टिक टॉकवर बहुतांश व्हिडिओ आवाज डब करुन तयार केले जातात. मात्र मोहसीन खानने स्वत:च्या आवाजात हे व्हिडिओ तयार केले आहेत. मोहसीन खान १४२३ या नावाने टिकटॉकवर त्याचे अकाऊंट असून दररोज तो व्हिडिओ तयार करुन अपलोड करतो.पॉप्युलर क्रिएटरसाठी प्रयत्नटिकटॉकवर ३० लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स असतानाही टिकटॉकने अद्याप या गुणी कलावंताची दखल घेतली नाही. टिकटॉकने पॉप्युलर क्रिएटर या यादीत समाविष्ट केले तर मोहसीन खान यास ठराविक रक्कम टिकटॉककडून मिळू शकते. त्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती मोहसीन खान आणि त्याचे मित्र अमीर खान यांनी दिली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीTik Tok Appटिक-टॉक