शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

परभणी : भारनियमन वाढविल्याने मनसेने भेट दिला कंदील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 00:28 IST

शहरात महावितरण कंपनीने ९ तासांचे भारनियमन करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांना कंदील भेट देऊन आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : शहरात महावितरण कंपनीने ९ तासांचे भारनियमन करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांना कंदील भेट देऊन आंदोलन केले.नवरात्र काळात विजेचा तुटवडा निर्माण झाल्याने नऊ तासांचे भारनियमन करण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतला आहे. या निर्णयामुळे विजेवर अवलंबून असलेले व्यवसाय कोलमडले आहेत. यापूर्वी शहरात केवळ तीन तास भारनियमन होत होते. सोमवारपासून तीन टप्प्यात नऊ तास भारनियमन करण्याचा निर्णय घेण्यात आला.भारनियमन वाढविल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन मनसेने सोमवारी आंदोलन केले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष शेख राज, गुलाब रोडगे, गणेश भिसे, निजलिंगअप्पा तरवडगे, गणेश निवळकर, अशोक शेलार, प्रभूराज तेवर, सय्यद जावेद यांनी मेश्राम यांना निवेदन दिले. तसेच जय भवानी नवरात्री महोत्सव, जगदंबा देवी संस्थान, श्री सरस्वती नवरात्र महोत्सव, अष्टभूजा नवरात्र महोत्सव आदी मंडळाच्या वतीनेही निवेदन देऊन भारनियमन बंद करावे, अशी मागणी करण्यात आली.सोमवारी सहा तासच भारनियमनमहावितरण कंपनीने नऊ तास भारनिययमन करण्याचा निर्णय घेतला असला तरी सोमवारी मात्र सहा तासांचेच भारनियमन करण्यात आले. तिसºया टप्यातील सायंकाळी ६ ते ९ या वेळेतील भारनियमन झाले नाही. त्यामुळे शहरवासियांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

टॅग्स :parabhaniपरभणीPower Shutdownभारनियमनmahavitaranमहावितरण