शहरं
Join us  
Trending Stories
1
'१२ वर्षांनी त्यांना जाग आली, माझ्यामुळे त्यांचे अनेक मंत्री घरी गेले'; अण्णा हजारेंचे शरद पवारांना प्रत्युत्तर
2
पेट्रोल, डिझेल GST मध्ये? राज्यांवर बंधने? कसे असेल मोदी ३.० सरकार; प्रशांत किशोर यांनी केले ४ जूननंतरचे भाकीत
3
विशेष मुलाखत : देशाची राज्यघटना वाचविण्यासाठी यंदाची निवडणूक अतिशय महत्त्वाची - अखिलेश यादव 
4
त्या मुलामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली; प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचे गंभीर आरोप
5
बिल्डर विशाल अग्रवालच्या प्रतापी बाळावर आरटीओ मोठी कारवाई करण्याच्या तयारीत, 1780 रुपये भरले नव्हते...
6
"माहितीये का तुझा बाप कोण आहे?" जेव्हा Zomatoच्या मालकाला त्यांच्याच वडिलांनी विचारलेला हा प्रश्न...
7
'श्रीमंताच्या मुलाला निबंध अन् ट्रक चालकांना १० वर्षाची शिक्षा'; पुणे प्रकरणात राहुल गांधींचा सवाल
8
लहान असताना कंपनीत औषधं बनताना पाहिली, आज ७० देशांमध्ये व्यवसाय; नेटवर्थही ८८ हजार कोटींपेक्षा अधिक
9
आजचे राशीभविष्य: विधायक कार्य घडेल, वाहनसुख मिळेल; पैसा-प्रतिष्ठा लाभेल, कौतुक होईल
10
गणेशाचा पुष्टिपती विनायक अवतार, खुद्द श्रीकृष्ण-रुक्मिणीने केले होते पूजन; कथा अन् महात्म्य
11
गुरु शुक्र उदय: ३ राशींना यशाचा काळ, येणी वसूल होतील; गुंतवणुकीतून फायदा, नवीन डील लाभदायी!
12
३१० प्रवासी थाेडक्यात बचावले, वनविभागाकडून मृत्यूची चौकशी
13
पडक्या हॉटेलमध्ये लपलेल्या बिल्डर अग्रवालला अखेर अटक; ‘बाळा’ने दोन तासांत उडवले ४८ हजार
14
मतदानाच्या विलंबाची कारणे शाेधणार, निवडणूक कार्यालयात हालचालींना वेग
15
रेसमध्ये आम्हीच पुढे! बारावीचा निकाल ९३.३७%; २.१२% वाढली यंदा उत्तीर्णाची संख्या 
16
बालन्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक, कारवाईत हयगय होणार नाही - फडणवीस
17
३९ फ्लेमिंगोंनी त्यांचा अखेरचा श्वास मुंबईच्या मोकळ्या आकाशात घेतला...
18
३७ हजार फूटांवर विमानाला वाऱ्याचा तडाखा; एका प्रवाशाचा मृत्यू, ३० जखमी; ६ मिनिटांत विमान ६ हजार फूट खाली
19
निकालाच्या दिवशी ‘ड्राय डे’ला विरोध; हॉटेल्स ओनर्स असोसिएशनची उच्च न्यायालयात याचिका
20
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी

परभणी : दूध उत्पादकांचे अनुदान थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 11:27 PM

शासनाकडून खरेदी करण्यात येत असलेल्या दुधाचे मागील दोन महिन्यांपासून अनुदान थकीत असल्याने दूध उत्पादक संस्था आणि शेतकरी अडचणीत सापडले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी) : शासनाकडून खरेदी करण्यात येत असलेल्या दुधाचे मागील दोन महिन्यांपासून अनुदान थकीत असल्याने दूध उत्पादक संस्था आणि शेतकरी अडचणीत सापडले आहेत़परभणी जिल्ह्यात मागील काही वर्षांत शेतकरी मोठ्या प्रमाणावर दूध व्यवसायाकडे वळले आहेत़ यावर्षी दुष्काळी परिस्थिती असतानाही शेतकरी आपले पशूधन सांभाळून दूध विक्री करीत आहेत़ शासकीय दूध खरेदी केंद्रावर दूध विक्री केल्यानंतर १५ दिवसांत दूध उत्पादक संस्थांना शासनाचे दुधाचे अनुदान वितरित करणे अपेक्षित असते़ मात्र मागील दोन महिन्यांपासून दुधाचे अनुदान थकले आहे़ पाथरी तालुक्यातील ३५ दूध उत्पादक संस्था दररोज किमान २५ हजार लिटर दुधाचा पुरवठा करतात़ मात्र मागील दोन महिन्यांपासून अनुदान मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत़ परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्यातून सर्वाधिक दूध पुरवठा होतो़ शासनाने जिल्ह्याला २०१९-२० या वर्षात दूध खरेदीसाठी मंजूर १६ कोटी रुपयांपैकी केवळ ५ कोटी रुपयांचेच दूध खरेदीचे अनुदान वितरित केले आहे़ मंजूर अनुदानातील ११ कोटी रुपये अद्यापही शिल्लक आहेत़ त्यामुळे दूध उत्पादक संस्थेचे २ महिन्यांची देयके थकले आहेत़ याकडे तत्काळ लक्ष देऊन थकीत अनुदान वाटप करावे, अशी मागणी आ़ मोहन फड यांनी पशूसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे़ दरम्यान, राज्य शासन थकीत अनुदान लवकरच उपलब्ध करून देईल, असे आश्वासन मंत्री महादेव जानकर यांनी दिल्याची माहिती आ़ मोहन फड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़

टॅग्स :parabhaniपरभणीmilkदूधGovernmentसरकार