परभणी: अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाचे दर गगनाला भिडणार आणि साठा कमी पडणार, अशा अफवा पसरल्याने परभणी शहरासह जिल्ह्यात पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेली ही गर्दी बुधवारी सकाळपर्यंत कायम असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
धुलीवंदनानंतर रात्रीपासून गर्दीमंगळवारी धुलीवंदनानिमित्त खबरदारी म्हणून शहरातील बहुतांश पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले होते. सायंकाळी ६ वाजेनंतर पंप सुरू होताच वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. विशेष म्हणजे, महामार्ग आणि प्रमुख बाजारपेठेतील पंपांवर मध्यरात्रीपर्यंत नागरिकांची पेट्रोल भरण्यासाठी लगबग सुरू होती.
पंप चालकांचे स्पष्टीकरणपरभणी शहराला सोलापूर डेपोतून इंधन पुरवठा केला जातो. जिल्ह्यात विविध कंपन्यांचे ११० हून अधिक पेट्रोल पंप आहेत. "अद्याप इंधनाचे दर वाढलेले नाहीत किंवा साठा कमी झाल्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना प्राप्त झालेली नाही. साठा मुबलक उपलब्ध आहे," असे पेट्रोल पंप चालकांनी स्पष्ट केले आहे. मात्र, जागतिक युद्धाच्या भीतीने नागरिक नेहमीपेक्षा जास्त इंधन भरण्याला प्राधान्य देत आहेत.
परभणीतील आजचे दर (बुधवार):साधे पेट्रोल: १०५.४९ रुपयेपॉवर पेट्रोल: ११३.११ रुपये
Web Summary : Fuel price hike rumors sparked panic buying in Parbhani. Despite assurances of adequate stock and no price increase from pump owners, long queues formed. Residents fear global conflict impacting fuel availability.
Web Summary : परभणी में ईंधन की कीमतों में बढ़ोतरी की अफवाहों से दहशत में खरीदारी हुई। पंप मालिकों के पर्याप्त स्टॉक और कीमतों में वृद्धि न होने के आश्वासन के बावजूद, लंबी कतारें लग गईं। निवासियों को वैश्विक संघर्ष से ईंधन की उपलब्धता प्रभावित होने का डर है।