शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

परभणी : हमीभाव केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 23:53 IST

येथील शासकीय हमीभाव केंद्रावर तूर विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. मागील १५ दिवसांत ९ मार्चपर्यंत ६६ शेतकऱ्यांची केवळ ४३३ क्विंटल ५० किलो तूर खरेदी करण्यात आली आहे. तर बाजार समितीच्या यार्डात २७ फेब्रुवारीपर्यंत १२ हजार ५२५ क्विंटल तूर शेतकºयांनी खाजगी व्यापाºयांना विक्री केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी) : येथील शासकीय हमीभाव केंद्रावर तूर विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. मागील १५ दिवसांत ९ मार्चपर्यंत ६६ शेतकऱ्यांची केवळ ४३३ क्विंटल ५० किलो तूर खरेदी करण्यात आली आहे. तर बाजार समितीच्या यार्डात २७ फेब्रुवारीपर्यंत १२ हजार ५२५ क्विंटल तूर शेतकºयांनी खाजगी व्यापाºयांना विक्री केली आहे.मानवत तालुक्यात २०१७ यावर्षात एकूण ३६०० हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती. मात्र २०१८ मध्ये खरीप हंगामात तूर या पिकाच्या पेरणी क्षेत्रात घट झाल्याचे दिसून आले. मानवत मंडळात १२०५ हेक्टर, कोल्हा मंडळात ६३७ हेक्टर तर केकरजवळा मंडळात ९५९ हेक्टर अशा एकूण २८०१ हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी झाली होती. पावसाळ्याच्या सुरुवातीला बºयापैकी पाऊस झाल्याने शेतकरी समाधानी होते. मात्र शेवटच्या दीड महिन्यात पावसाने खंड दिल्याचा याचा फटका तालुक्यातील तूर उत्पादक शेतकºयांना बसला. यामुळे शेतकºयांना अनंत अडचणीला तोंड द्यावे लागले. डिसेंबर महिन्यात शेतकºयांनी बाजारपेठेत तूर विक्रीसाठी आणण्यास सुरवात केली होती.सुरुवातीच्या काळात तुरीला ४७०० रुपये दर मिळाला होता. त्यामुळे शेतकºयांमध्ये नाराजी दिसून येत होती. यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. सद्यस्थितीत तुरीला बाजार पेठेत ५१०० ते ५२०० रुपये दर मिळत आहे. खरेदी विक्री संघामार्फत शासकीय हमीभाव केंद्र सुरु करण्यात आले आहे. विदर्भ फेडरेशनच्या वतीने २७ फेब्रुवारीपासून ५६७५ हमीदराने तूर खरेदीला सुरवात केली आहे. तालुक्यातील ४८३ शेतकºयांनी तूर विक्री करण्यासाठी आॅनलाईन नोंदणी केली आहे. यापैकी १११ जणांना तूर विक्री करण्यासाठी संदेश पाठविण्यात आले होते. या पैकी केवळ ६६ शेतकºयांनी तूर विक्रीसाठी हमीभाव केंद्रावर आणली आहे. एकूणच शासकीय हमीभाव केंद्राकडे शेतकºयांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.शेतकºयांची खाजगी व्यापाºयांना पसंतीकृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात डिसेंबरपासून २७ फेब्रुवारीपर्यंत १२ हजार ५२५ क्विंटल तूर शेतकºयांनी खाजगी व्यापाºयांना विक्री केली आहे. शासकीय हमीभाव केंद्रावर तूर विक्री करण्यासाठी करावी लागणारी धावपळ तसेच तूर विक्री केल्यानंतर आपल्या हक्काच्या पैशाची वाट पाहावी लागत असल्याने शेतकरी खाजगी व्यापाºयांना माल विक्री करण्यासाठी पसंती देत आहेत. तुरीचे भाव वाढतील, या आशेने अनेक शेतकºयांनी तूर घरातच ठेवली आहे. दुसरीकडे हरभराही शेतकरी विक्री करीत आहेत. आतापर्यंत ६११७ क्विंटल हरभरा शेतकºयांनी खाजगी व्यापाºयांना विक्री केल्याची नोंद बाजार समिती कडे झाली आहे.कापसाच्या भावाततेजीबाजार समितीच्या यार्डात कापसाची आवक वाढली असून ११ मार्च रोजी लिलाव यार्डात २०० गाड्यांची आवक होती. यावेळी झालेल्या लिलावात कापसाला ५६८० रुपये दर मिळाला. पंधरा दिवसानंतर सरकीचे भाव वधारल्याने कापसाच्या दरात तेजी पहावयास मिळाली. भाव वाढल्याने शेतकºयांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. ११ मार्चपर्यंत ३ लाख २० हजार क्विंटल कापसाची खरेदी झाल्याची नोंद बाजार समितीकडे झाली आहे. यामध्ये सीसीआयने १५ हजार क्विंटल कापूस खरेदी केला आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरी