शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

परभणी : जायकवाडीचे पाणी मुदगलपर्यंतच देण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 23:40 IST

जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी पालम तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यापर्यंत देण्याच्या निर्णयात काही तासांतच या विभागाच्या औरंगाबाद येथील मुख्य अभियंत्यांनी बदल केला असून, आता हे पाणी सोनपेठ तालुक्यातील मुदगल बंधाºयापर्यंतच सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जायकवाडी प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी पालम तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यापर्यंत देण्याच्या निर्णयात काही तासांतच या विभागाच्या औरंगाबाद येथील मुख्य अभियंत्यांनी बदल केला असून, आता हे पाणी सोनपेठ तालुक्यातील मुदगल बंधाºयापर्यंतच सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे मुदगल बंधाºयाखाली येणाºया जिल्ह्यातील अनेक गावांना पाण्याचा लाभ मिळणार नसल्याची चर्चा आहे.गोदावरी नदीवरील औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरणात सध्या ९१़५१ टक्के पाणी जमा झाले आहे़ या धरणातून उजव्या कालव्यात ९०० क्युसेसने आणि डाव्या कालव्यात १६०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे़ पैठण येथील जल विद्युत केंद्रातून १५८९ क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून, नदीपात्रात ४ हजार १९२ क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे़ परभणी जिल्ह्यात डाव्या कालव्यातून पाणी दाखल झाले असून, हे पाणी ढालेगाव बंधाºयात सोडण्यात आले होते़ आता नदीपात्रातील पाणीही ढालेगाव बंधाºयात दाखल झाल्याने बंधाºयाचा एक दरवाजा उघडण्यात आला आहे़ जिल्हा प्रशासनाने कालवा आणि नदीपात्र दोन्ही माध्यमातून पाणी सोडण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली होती़ नदीपात्रातून सोडण्यात येणारे पाणी पालम तालुक्यातील डिग्रस बंधाºयापर्यंत सोडावे, अशीही मागणी त्यामध्ये होती़ डिग्रस बंधाºयापर्यंत पाणी पोहचल्यानंतर डिग्रस बंधाºयाचे दरवाजे बंद करून टप्प्या टप्प्याने वरील बाजुचे बंधारे भरण्याचे पाटबंधारे विभागाचे नियोजन होते़ त्यामुळे पालम, गंगाखेड, पूर्णा तालुक्यातील शेतीला तसेच पिण्यासाठी या पाण्याचा फायदा होणार होता़ पूर्व नियोजित हे चित्र असताना बुधवारी दुपारी औरंगाबाद येथील जायकवाडी प्रकल्पाच्या कार्यालयात घडामोडी घडल्या आणि डिग्रसपर्यंत सोडण्यात येणारे पाणी सोनपेठ तालुक्यातील मुदगल बंधाºयापर्यंतच देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते. त्यामुळे मुदगल खालील परिसर पाण्यापासून वंचित राहणार आहे़ परिणामी गोदावरी नदीपात्राच्या बाजुला असलेल्या गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायम राहणार असून, पिकांना पाणीही देता येणार नाही़ त्यामुळे जिल्ह्याच्या अर्ध्या भागाला जायकवाडी प्रकल्पाचा फायदा होईल तर अर्धा भाग पाण्यापासून वंचित राहील़ त्यामुळे जायकवाडी प्रकल्पात पाणी उपलब्ध असूनही मुदगल बंधाºयाखालील भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती कायम राहणार आहे़ पाटबंधारे विभागाच्या या निर्णयाबद्दल जिल्हावासियांमधून संताप व्यक्त केला जात आहे़ पाटबंधारे विभागाने हा निर्णय बदलून डिग्रस बंधाºयापर्यंत पाणी सोडावे, जेणे करून नदीपात्रात आणि नदीपात्राच्या परिसरातील विंधन विहिरींच्या पाणी पातळीत वाढ होईल, अशी मागणी जिल्हावासियांमधून केली जात आहे़ दरम्यान, या संदर्भात प्रतिक्रियेसाठी परभणी येथील जायकवाडी विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही़ जिल्हा प्रशासनाला मात्र या संदर्भात कोणतेही लेखी आदेश मिळाले नसल्याची माहिती देण्यात आली़धरणातील २ टक्के पाणी खरीप पिकासाठी द्या-राजन क्षीरसागर४जिल्ह्यात जुलै अखेरपर्यंत सर्व महसूल मंडळात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला आहे़ त्यामुळे अल्पश: पावसावर आलेली पिके पाण्याअभावी सुकून जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांना या गंभीर संकटातून सावरण्यासाठी जायकवाडी प्रकल्पाच्या प्रकल्पीय तरतुदीनुसार २ टक्के पाणी खरीप पिकांसाठी सोडून देण्यात यावे, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य कॉ़ राजन क्षीरसागर यांनी औरंगाबाद येथील गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे़४या संदर्भात दिलेल्या निवेदनात क्षीरसागर यांनी जायकवाडी डावा कालवा बी-७० वरील खांबेगाव, महातपुरी, बलसा, पिंप्री, मिरखेलसह सर्व गावांतील शेतकºयांना तातडीने दुष्काळी परिस्थितीत उभी पिके वाचविण्यासाठी व पिण्यासाठी पाणी तत्काळ उपलब्ध करून द्यावे, नियमाप्रमाणे टेल टू हेड रोटेशन द्यावे, शेत चारीवरील आॅऊटलेटमधून १ क्युसेस पाणी मिळण्याची हमी द्यावी, रोहयोचा निधी आणि खात्याचा निधी मिळून कालव्यांची दुरुस्ती करावी, कालवा सल्लागार समित्यांची पुनर्रचना करावी, जायकवाडी प्रकल्पाचे डिजीटलायझेशन न्यायालयाच्या आदेशानुसार पूर्ण करावे, पाणी वाटप सोसायट्या क्रियाशील कराव्यात आणि जायकवाडी विभाग क्रमांक २ मधील सर्व रिक्त पदांवर मनुष्यबळ तत्काळ उपलब्ध करावे, अशीही मागणी क्षीरसागर यांनी निवेदनात केली़ निवेदनावर जि़प़ सदस्य श्रीनिवास जोगदंड, माधवराव देशपांडे, अच्युत तांबे, सुरेश श्रृंगारपुतळे, आप्पाराव तांबे, दिगंबर तांबे, पांडूरंग चौरे, खोबराजी चौरे, गंगाधर कदम, ऋतूराज कदम, माऊली डुबे आदींची नावे आहेत़ढालेगावमध्ये आलेले पाणी मुदगलमध्ये सोडले४पाथरी- तालुक्यातील ढालेगाव बंधाºयात वरील भागातील चार बंधाºयातून ४ हजार ९८८ क्युसेसने पाणी सोडण्यात आले़ बुधवारी पहाटे हे पाणी ढालेगाव बंधाºयात दाखल झाल्यानंतर सकाळी ९ च्या सुमारास १६०० क्युसेसने हे पाणी मुदगल बंधाºयात सोडण्यात आले़ ं४सायंकाळी ५ च्या सुमारास ढालेगाव बंधाºयात १़९१ दलघमी जीवंत पाणीसाठा होता़ वरच्या भागातून ४ हजार ६०० क्युसेस पाणी येत आहे़ तर १६०० क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे़ त्यामुळे ३ हजार क्युसेस पाणी बंधाºयात राहत आहे़४गोदावरी नदीपात्रातून ढालेगाव बंधाºयात सोडण्यात येत असलेल्या पाण्यातील ३़४६ दलघमी पाणी पाथरी नगरपालिकेने आरक्षित केले आहे़ त्यामुळे पाथरी शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे़ दरम्यान, नदीपात्रातून ढालेगावमध्ये पाणी आल्याने कालव्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे़४आता ५९ मायनर गेटमधून डाव्या कालव्यात पाण्याचा विसर्ग कायम राहणार आहे़ याशिवाय परळी येथील औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी खडका बंधाºयातून पाणी देणे सुरू राहणार आहे़ यामुळे परळीच्या औष्णिक विद्युत प्रकल्पाचाही पाण्याचा प्रश्न मिटणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पWaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरण