शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

परभणी: तंत्रनिकेतनच्या शाखांना अखेरची घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 00:02 IST

एकेकाळी शहराचे वैभव असणारे येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. अनुविद्युत व उपकरणीकरण शाखेला विद्यार्थीच नसल्याने या शाखा बंद पडतात की काय? ंअसे वाटत आहे. हे जिंतूरचे वैभव वाचविण्यासाठी शिक्षण प्रेमी नागरिकांनी जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजिंतूर (परभणी): एकेकाळी शहराचे वैभव असणारे येथील शासकीय तंत्रनिकेतन विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. अनुविद्युत व उपकरणीकरण शाखेला विद्यार्थीच नसल्याने या शाखा बंद पडतात की काय? ंअसे वाटत आहे. हे जिंतूरचे वैभव वाचविण्यासाठी शिक्षण प्रेमी नागरिकांनी जनजागृती करण्याची गरज व्यक्त केली आहे.जिंतूर शहराला शासकीय तंत्रनिकेतनमुळे नावलौकिक मिळाला आहे. एकेकाळी पुणे, मुंबई येथून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येत होते. कालांतराने या महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक व विविध सोयी-सुविधा नसल्याने विद्यार्थी संख्या रोडावली होती; परंतु, मागील दोन ते तीन वषार्पासून शासकीय तंत्रनिकेतनमध्ये विद्यार्थी संख्या भरपूर असल्याने महाविद्यालय फुलून गेले होते. यावर्षी मात्र महाविद्यालयाला अखेरची घरघर लागली आहे. महाविद्यालयामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, अनुविद्युत अभियांत्रिकी, उपकरणीकरण अभियांत्रिकी या शाखा आहेत. प्रत्येक शाखेत ६० विद्यार्थी क्षमता आहे. यावर्षी तर अनेक शाखांमध्ये विद्यार्थीच नाहीत. उपकरणीकरण अभियांत्रिकी शाखेत प्रथम वर्षाला केवळएका विद्यार्थ्याने प्रवेश घेतला आहे. द्वितीय वर्षाला ८ विद्यार्थी व तृतीय वर्षाला १५ विद्यार्थी आहेत. पुढील वर्षीही शाखा चालू राहते की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विद्युत अभियांत्रिकीमध्ये तर प्रथम वर्षाला विद्यार्थीच नाहीत. द्वितीय वर्षात ८ विद्यार्थी आहेत.संगणक अभियांत्रिकीकडेही विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली आहे. या वर्षी प्रथम वर्षाला १४ विद्यार्थी, द्वितीय वर्षाला १४ विद्यार्थी, तृतीय वर्षाला ३३ विद्यार्थी आहेत. त्यामुळे या शाखेतील विद्यार्थी कमी होताना दिसत आहेत. यंत्र अभियांत्रिकी शाखेमध्ये जेमतेम विद्याथी ७ असून स्थापत्य अभियांत्रिकी शाखेमध्ये प्रथम वर्षाला केवळ २६ विद्यार्थी आहेत. तर द्वितीय वर्षात ४० विद्यार्थी संख्या आहे.भविष्यामध्ये उपकरणीकरण शाखा, अनुविद्युत अभियांत्रिकी व संगणक अभियांत्रिकी या शाखा बंद पडतात की काय? याबाबत संशय व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे महाविद्यालयांमध्ये मागील तीन वषार्पासून सर्व विषयाचे प्राध्यापक व तज्ञ असतानासुद्धा विद्यार्थी इकडे फिरकत नसल्याने शासकीय तंत्रनिकेतनचे भवितव्य धोक्यात आले आहे. यासाठी जिंतूरकरांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.नोकरीच्या संधी कमीएकेकाळी शासकीय तंत्रनिकेतनमधून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये तत्काळ नोकरीची संधी उपलब्ध होत होती; परंतु, मागील चार ते पाच वर्षांपासून नोकरीच्या संधी कमी झाल्याने शासकीय तंत्रनिकेतनमध्ये येणाऱ्या विद्यार्र्थ्यांची संख्या रोडावली आहे. विशेषत: संगणक अभियांत्रिकी शाखेला विद्यार्थी मिळत नाहीत. यावरून बेरोजगारी या क्षेत्रात किती प्रचंड आहे? हे दिसते.सद्य स्थितीत अनुविद्युत उपकरणीकरण शाखेस विद्यार्थ्यांचा कल कमी दिसते; परंतु, वाढते औद्योगिकरण व संगणकीय व्यवस्थेसाठीच दोन्ही शाखा महत्त्वाच्या आहेत. विशेष म्हणजे जिंतूर येथे जिल्ह्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आहे. या ठिकाणी शासनाच्या सर्व सुविधा मिळतात. गरजू विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा.-डॉ. के.बी. लाढाणे, प्राचार्य शासकीय तंत्रनिकेतन

टॅग्स :parabhaniपरभणीiti collegeआयटीआय कॉलेजStudentविद्यार्थी