शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

परभणी: पाथरी तालुक्यात हळदीच्या उताऱ्यात मोठ्या प्रमाणात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:33 IST

सातत्याने बोंडअळीचा प्रादूर्भाव सहन करणाºया कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस पिकाला पर्याय म्हणून हळदीची मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र यावर्षी पाऊस कमी झाल्याने हळद पिकाला तालुक्यात उतारा कमी येऊ लागला आहे. त्यातच खर्च जास्त आणि उत्पन्नात घट, अशी अवस्था झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी (परभणी): सातत्याने बोंडअळीचा प्रादूर्भाव सहन करणाºया कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापूस पिकाला पर्याय म्हणून हळदीची मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र यावर्षी पाऊस कमी झाल्याने हळद पिकाला तालुक्यात उतारा कमी येऊ लागला आहे. त्यातच खर्च जास्त आणि उत्पन्नात घट, अशी अवस्था झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.कापसाचे भांडार समजल्या जाणाºया पाथरी तालुक्यात मागील वर्षापासून कापसावर गुलाबी बोंडअळीने थैमान घातले आहे. त्यामुळे शेतकºयांचे पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणाºया कापूस उत्पादनात मोठी घट होऊन लागवडीचा खर्च ही निघणे अवघड झाले. त्याच बरोबर सोयाबीनला ही पाहिजे तसा उतारा येत नसल्याने आता तालुक्यातील अनेक शेतकरी निरोगी उत्पादनाची हमी असणाºयांना हळदीची मोठ्या प्रमाणात लागवड करू लागले आहेत.यावर्षी ही मोठ्या प्रमाणात हळद लागवड करण्यात आली आहे; परंतु, पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने हळदीच्या उत्पादनात मोठी घट दिसून येऊ लागली आहे.तालुक्यात सध्या हळद काढणी सुरू आहे. मात्र उतारा घटल्याने हळद लागवड करणारे पाथरी तालुक्यातील बहुतांश शेतकरी अडचणीत सापडले आहेत.दुष्काळामुळे ५० टक्के उत्पादन घटलेएका एकरमध्ये पिकातून जवळपास ८० ते ९० क्विंटलपर्यंत उत्पादन अपेक्षित असते. १०० क्विंटल ओल्या हळदीमधून २० ते २५ क्विंटल पक्की हळद तयार होते; परंतु, यावर्षी पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्यामुळे हळदीच्या उताºयात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.सध्या हळद काढणी सुरू असून एका एकरमध्ये केवळ ५० ते ५५ क्विंंटल हळद उत्पादनाचा उतारा येत आहे. त्यामुळे यावर्षीच्या दुष्काळामुळे उत्पादनात ५० टक्क्यांनी घट झाली आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीFarmerशेतकरीdroughtदुष्काळ