शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

परभणी: इरळदची जि.प. शाळा झाली आंतरराष्ट्रीय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 00:29 IST

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळातर्फे जिल्ह्यातील नोंदणी झालेल्या १५२ पैकी निवडलेल्या ५ शाळांचे मूल्यांकन करून जागतिक महिला दिनी मानवत तालुक्यातील इरळद येथील जि.प. प्राथमिक शाळेला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा बहाल केला आहे. टप्या टप्याने या शाळांना विशेष तरतूद उपलब्ध करून भौतिक व शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी शासन पुढाकार घेणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत (परभणी) : महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळातर्फे जिल्ह्यातील नोंदणी झालेल्या १५२ पैकी निवडलेल्या ५ शाळांचे मूल्यांकन करून जागतिक महिला दिनी मानवत तालुक्यातील इरळद येथील जि.प. प्राथमिक शाळेला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा बहाल केला आहे. टप्या टप्याने या शाळांना विशेष तरतूद उपलब्ध करून भौतिक व शैक्षणिक दर्जा उंचविण्यासाठी शासन पुढाकार घेणार आहे.मानवत तालुक्यातील इरळद शाळेतील विविध उपक्रम, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, आदर्श लोकसहभाग, सुसज्ज इमारत, शाळेचा परिसर, क्रीडांगण, अद्ययावत स्वतंत्र स्वच्छतागृह, फिल्टर पाणीपुरवठा, हॅन्ड वॉश स्टेशन, बोलक्या भिंती, डिजिटल वर्गखोल्या, एबीएल पद्धतीची पाहणी पथकाद्वारे करण्यात आली.इरळद शाळेचा नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा तयारी पॅटर्न, विविध स्पर्धा परीक्षा तयारी वर्ग आणि गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा आलेख, शाळेची पट व उपस्थिती, रोपवाटिका, कचरा व्यवस्थापन, सुंदर बगीचा, सुसज्ज प्रयोगशाळा, माझे वाचनालय, विद्यार्थी बचत बँक, रात्र अभ्यासगट, झांजपथक असे अनेक उपक्रम प्रभावित करणारे ठरले. शालेय व्यवस्थापन समितींतर्गत आदर्श कामकाज, ग्रामपंचायत इरळद मार्फत शाळेत झालेल्या विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्याच बरोबर ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद, शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापक यांच्या आंतरक्रिया आदींचे परीक्षण करण्यात आले.मागील आठ ते दहा वर्षात लोकसहभागातून शाळेत जवळपास २२ लाख रुपये लोकवर्गणीद्वारे जमीन खरेदीसह शाळेत आदर्श कामे करण्यात आली. ग्रामस्थांचे शाळेविषयी असणारे प्रेम व समपर्णाची भावना पाहून पथक भारावून गेले होते. सलग अकरा वर्षात २० विद्यार्थी नवोदय धारक तर २२ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.या उपक्रमातूनच महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या संलग्नतेसाठी शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यात उपयुक्त ठरला. त्यामुळे जून २०१९ पासून इरळदच्या शाळेत पूर्वप्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण महाराष्ट्र शासनामार्फत उपलब्ध होणार आहे. याचा लाभ या शाळसोबत शेजारील दहा ते पंधरा गावांतील विद्यार्थ्यांना होणार आहे. तसेच ग्रामीण भागातील वंचित घटकाला हक्काचे, दर्जेदार, शिक्षण मिळणार आहे.दहावीच्या वर्र्गालाही मिळाली मान्यता४पुढील वर्षापासून शाळेत नववी ते दहावी वर्ग सुरु करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने इरळद येथील शाळेला विशेष शासकीय निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. शाळेला प्राप्त झालेल्या घवघवीत यशाच्या बहुमानाला येथील आजी-माजी मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांची मागील १५ वर्षांची कठोर मेहनत, जिद्द आणि लोकसहभागासह योग्य मार्गदर्शन ही त्रिसूत्री यशाचे गमक ठरली आहे.४परभणी जिल्ह्यातील इतर शाळांसमोर दैदिप्यमान आदर्श ठेवला आहे. इरळद गावासह मानवत पंचायत समिती आणि परभणी जिल्ह्याच्या शैक्षणिक उत्कर्षाचा गौरव इरळद शाळेने राज्यस्तरावर दिमाखात वाढवला आहे. याबद्दल शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थांचे कौतुक होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीSchoolशाळाInternationalआंतरराष्ट्रीय