शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : दुधना नदीपात्रातून अवैध वाळूउपसा जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 00:24 IST

तालुक्यातून वाहणाऱ्या दुधना नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूचा बेसुमार उपसा करून ट्रॅक्टरद्वारे बिनबोभाट वाहतूक केली जात आहे. या प्रकाराकडे महसूल विभाग दुर्लक्ष करीत असल्याने वाळूतस्करांचे फावत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (परभणी) : तालुक्यातून वाहणाऱ्या दुधना नदीपात्रातून अवैधरीत्या वाळूचा बेसुमार उपसा करून ट्रॅक्टरद्वारे बिनबोभाट वाहतूक केली जात आहे. या प्रकाराकडे महसूल विभाग दुर्लक्ष करीत असल्याने वाळूतस्करांचे फावत आहे़तालूक्यातील काजळी रोहिणा परिसरातील दुधना नदी पात्रातून अनेक दिवसांपासून रात्रंदिवस वाळू उपसा करून ट्रॅक्टरद्वारे बिनधास्तपणे वाहतूक केली जात आहे. वाळूच्या उपशामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे नदीपात्राचे वाळवंट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाळूचा अवैध उपसा होत असल्याने पाणीटंचाई तीव्र होण्याची चिन्हे आहेत.रोहिणा शिवारातून दररोज १० ते १२ ट्रॅक्टरच्या साह्याने वाळूची वाहतूक होत आहे़ यामुळे शासनाच्या लाखोंच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे़ वाळूची चोरटी वाहतूक करणारी वाहने भरधाव वेगात चालविली जातात. त्यामुळे ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.ट्रॅक्टरच्या वाहतुकीमुळे ये-जा करणाºया ग्रामस्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दिवस-रात्र वाळूचा उपसा सुरू असून, एक ब्रास वाळू अव्वाच्या सव्वा दराने विक्री केली जात आहे. या प्रकाराकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने वाळू तस्करांची हिंमत वाढत आहे.रोहिणा येथील सरपंच व सदस्य यांनी वाळू उपसा बंद करण्याची मागणी निवेदनाव्दारे वारंवार करूनही त्याचा उपयोग झाला नाही. महसूल विभागाने वाळू उपसा रोखण्यासाठी पथके नेमूनही हा प्रकार बंद होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.विभागीय आयुक्तांना निवेदनकाजळी रोहिणा परिसरातील दुधना नदी पात्रातून अवैधरीत्या वाळूचा बेसुमार होणारा उपसा थांबवावा, अशी मागणी सरपंच ज्योती काष्टे व दोन सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे मंगळवारी निवेदनाद्वारे केली आहे.कारवाईसाठी तीन पथके नियुक्तअवैधरीत्या वाळूचा उपसा रोखण्यासाठी महसूल विभागाने तीन पथकांची स्थापना केली आहे़ यासंदर्भात कारवाई केली जात आहे, अशी प्रतिक्रिया तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़नदीपात्राचे होत आहे वाळवंटसेलू, मानवत व परभणी तालुक्यातून वाहणाºया नदीपात्रात यावेळेस अत्यल्प पर्जन्यमान झाल्यामुळे पाणीसाठाच शिल्लक नाही़ त्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू उघडी पडली आहे़ याचा फायदा घेत अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे़ महसूल पथकाने जरी तीन पथके कारवाईसाठी नियुक्त केली असले तरी या पथकांकडून होणारी कारवाई ही तकलादू असल्याने याचा परिणाम वाळू तस्करांवर होताना दिसत नाही़ कारवाई करून मोकळे होणाºया महसूल विभागाच्या भूमिकेमुळे वाळूमाफियांना रान मोकळे सुटले आहे़ त्यामुळे दुधना नदीपात्राचे वाळवंट होत आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीriverनदीsandवाळू