शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
19
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
20
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच

परभणी: काँग्रेसच्या १८ इच्छुकांनी दिल्या मुलाखती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 00:20 IST

जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात १८ इच्छुक उमेदवारांनी मंगळवारी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या़ गंगाखेडसाठी एकही इच्छुक पुढे आला नाही तर जिंतूरमध्ये ऐनवेळी एकाने मुलाखत दिली़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात १८ इच्छुक उमेदवारांनी मंगळवारी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या़ गंगाखेडसाठी एकही इच्छुक पुढे आला नाही तर जिंतूरमध्ये ऐनवेळी एकाने मुलाखत दिली़जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे़ त्या दृष्टीकोनातून विविध राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे़ राष्ट्रवादी काँग्रेसची मुलाखत प्रक्रिया पार पडल्यानंतर बुधवारी काँग्रेसच्या वतीने शहरातील शनिवार बाजार भागातील जिल्हा कार्यालयात मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते़ जिल्हा प्रभारी आ़ डी़पी़ सावंत, भीमराव डोंगरे यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या़ यावेळी परभणी विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक म्हणजे तब्बल १६ जणांनी मुलाखती दिल्या़ यामध्ये माजी खा़ तुकाराम रेंगे, माजी आ़ सुरेश देशमुख, माजी उपमहापौर भगवान वाघमारे, नदीम इनामदार, गणेश देशमुख, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, रविराज देशमुख, सय्यद समी सय्यद साहब जान, सचिन अंबिलवादे, विशाल बुधवंत, बाळासाहेब देशमुख, सुनील देशमुख, सुरेश नागरे, मलिका गफार, मुजाहीद खान, सचिन देशमुख यांचा समावेश होता़ पाथरी विधानसभा मतदारसंघातून जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांनी मुलाखत दिली तर जिंतूर विधानसभा मतदारसंघात एकाही इच्छुकाने अर्ज दाखल केला नव्हता़ त्यामुळे पूर्वनियोजित यादी कोरीच होती़ऐनवेळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी नागसेन भेरजे यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी मुलाखत दिली़ गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून माजी तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी अर्ज दाखल केला होता; परंतु, त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली़ त्यानंतर वंचितकडे त्यांनी मुलाखतही दिली़ त्यामुळे काँग्रेसकडे गंगाखेडमधून निवडणूक लढवू इच्छिणारा उमेदवारच राहिला नाही़ त्यामुळे गंगाखेडची पाटी काँग्रेससाठी कोरीच राहिली़या मतदरसंघातून इतर तगड्या उमेदवाराला उमेदवारी द्यावी, अशी मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांनी केली;परंतु, आघाडीच्या तडजोडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असल्याने तसा निर्णय होण्याची शक्यता कमीच आहे़स्थानिकाच्या उमेदवारीसाठी आग्रह४परभणी विधानसभा मतदारसंघातून स्थानिक उमेदवारांनाच प्राधान्य देण्याची मागणी यावेळी उपस्थितांनी केली़ ऐनवेळी इतर पक्षातून येणारा किंवा पक्षात प्रवेश न करताच उमेदवारी मागणाऱ्या इच्छुकांना उमेदवार देवू नये़ त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल, अशी एकमुखी मागणी उपस्थितांनी केली़ यावरून यावेळी बरीच चर्चाही झाली़४आता पुढील आठवड्यात काँग्रेस पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाची मुंबईत बैठक होणार आहे़ या बैठकीनंतर पक्षाच्या उमेदवारांची घोषणा होणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेस