परभणी : शिस्तीऐवजी वसुलीवरच भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 12:51 AM2019-02-06T00:51:44+5:302019-02-06T00:51:54+5:30

जिल्हाभरात रस्ता सुरक्षा अभियानाला प्रारंभ झाला असला तरी परभणी शहरात मात्र या अभियानाच्या माध्यमातून वाहनधारकांना शिस्त लावण्याऐवजी वसुलीवरच पोलिसांचा भर असल्याचे दिसत आहे़ शहरातील वाहतूक अनेक वर्षांपासून बेशिस्त झाली असून, याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे़

Parbhani: Instead of disciplining, only the recovery of wealth | परभणी : शिस्तीऐवजी वसुलीवरच भर

परभणी : शिस्तीऐवजी वसुलीवरच भर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हाभरात रस्ता सुरक्षा अभियानाला प्रारंभ झाला असला तरी परभणी शहरात मात्र या अभियानाच्या माध्यमातून वाहनधारकांना शिस्त लावण्याऐवजी वसुलीवरच पोलिसांचा भर असल्याचे दिसत आहे़ शहरातील वाहतूक अनेक वर्षांपासून बेशिस्त झाली असून, याकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे़
शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्याची जबाबदारी शहर वाहतूक शाखेवर येऊन ठेपते़ शहरातील विविध भागांमध्ये वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना ड्युटी दिली असली तरी ठराविक पॉर्इंटवर हे कर्मचारी मोठ्या संख्येने थांबतात़ ज्या ठिकाणाहून जास्तीत जास्त वाहने जातात़ त्याच ठिकाणी हे कर्मचारी थांबत आहेत़ या उलट शहरातील बाजारपेठ भागात वाहतूक नियमांचे पदोपदी उल्लंघन होत असताना त्याकडे मात्र कर्मचाºयांची डोळेझाक होत असल्याचे दिसत आहे़ मागील अनेक वर्षांपासून बाजारपेठेतील वाहतूक विस्कळीत झालेली आहे़ येथील नारायण चाळ, विसावा कॉर्नर, गुजरी बाजार, शिवाजी चौक, नानलपेठ आदी भागांमध्ये दररोज वाहतुकीचा खोळंबा होत आहे़ मात्र ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी अनेक वेळा या ठिकाणी वाहतूक पोलीस उपस्थित नसल्याचे दिसून येते़ नारायण चाळ भागात दररोज वाहतुकीची कोंडी होते़ तर शनिवार बाजाराच्या दिवशी नानलपेठ कॉर्नर येथे ही अशीच परिस्थिती निर्माण होते़ विशेष म्हणजे या भागात शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालये, बँकांची कार्यालये आहेत़ त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक असते़ शनिवार बाजारामुळे वाहतूक वारंवार विस्कळीत होते़ या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ठोस पावले उचलली जात नाहीत़ नानलपेठ भागातून शिवाजी चौकाकडे येणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद असतानाही सर्रास विरुद्ध मार्गाने शिवाजी चौकात वाहने येतात़ या वाहनधारकांवरही कारवाई होत नाही़ तसेच गुजरी बाजारातून कच्छी बाजाराकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद असतानाही या मार्गानेही अनेक वेळा वाहने दामटली जातात़ या वाहनधारकांवरही कारवाई होत नाही़ या संपूर्ण बाजारपेठ परिसरात एकेरी वाहतुकीचे रस्ते आहेत़ या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला अस्थायी स्वरुपाचे अतिक्रमण वाढले आहे़ ही अतिक्रमणे हटविण्यासाठी कारवाई होत नसल्याने वाहतुकीचा खोळंबा वाढत चालला आहे़ रस्ता सुरक्षा अभियानात तरी या प्रश्नांकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देणे अपेक्षित आहे़ मात्र केवळ रस्त्याच्या दुतर्फा लावलेली वाहने उचलून वसुली वाढविण्याचाच सपाटा लावल्याने वाहनधारकांमधून रोष व्यक्त केला जात आहे़
पार्किंग नावालाच
तीन महिन्यांपूर्वी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी बाजारपेठ भागात वाहन तळासाठी महापालिकेने जागा निश्चित केली होती़ मात्र अनेक भागांमध्ये या वाहनतळाचा वापरच होत नाही़ वाहनतळ वापरण्यासाठी देखील प्रयत्न होत नाहीत़
सिग्नलचा प्रश्न कायम
शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी अनेक वर्षापूर्वी महापालिकने बसविलेले सिग्नल शोभेचे बनले आहेत़ बंद असलेले हे सिग्नल सुरू करण्यासाठी पोलीस प्रशासन, महापालिका दोन्ही विभाग प्रयत्न करीत नाहीत़ परिणामी ज्या उद्देशाने लाखो रुपयांचा खर्च केला़ त्या उद्देशालाच फाटा दिला जात आहे़

Web Title: Parbhani: Instead of disciplining, only the recovery of wealth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.