शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परभणी:अनियमित शिक्षक भरतीची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:00 IST

राज्यात २ मे २०१२ च्या शासन निर्णयान्वये शिक्षक भरतीला बंदी असताना अनेक संस्थांनी शिक्षक भरती प्रक्रिया राबविल्या प्रकरणाची शिक्षण आयुक्तांमार्फत चौकशी सुरु असून या भरती प्रक्रियेला मंजुरी देणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांवरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत राज्य शासनाने दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : राज्यात २ मे २०१२ च्या शासन निर्णयान्वये शिक्षक भरतीला बंदी असताना अनेक संस्थांनी शिक्षक भरती प्रक्रिया राबविल्या प्रकरणाची शिक्षण आयुक्तांमार्फत चौकशी सुरु असून या भरती प्रक्रियेला मंजुरी देणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांवरही शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत राज्य शासनाने दिले आहेत.राज्यात २ मे २०१२ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे शिक्षक भरतीवर बंदी घालण्यात आली होती. असे असताना शासनाचे निर्णय ढाब्यावर बसवून विविध खाजगी संस्थांनी जवळपास २ हजार शिक्षकांची भरती केल्याची तक्रार करण्यात आली होती. त्या अनुषंगाने करण्यात आलेल्या चौकशीत या तक्रारीत तथ्य आढळले. विशेष म्हणजे शासनाचे नियम डावलून भरती झाली असताना काही शिक्षणाधिकाऱ्यांनी भरती करण्यात आलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांना वैयक्तिक मान्यता देण्याचा पराक्रमही केला होता.यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल झाल्याची चर्चा होती. त्या अनुषंगाने तक्रारीनंतर राज्याच्या शिक्षण आयुक्तांमार्फत या प्रक्रियेची चौकशी सुरु करण्यात आली असून दोषींविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाºयांना देण्यात आल्याचे पत्र राज्याच्या शिक्षण विभागाने काढले आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. नियमबाह्यरित्या भरती करण्यात आलेल्या शिक्षकांना देण्यात आलेल्या वेतनाची वसुलीही शासनाकडून करण्यात येणार आहे.दरम्यान, परभणी जिल्ह्यातही अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात नियुक्त्या देण्याचा प्रकार घडला आहे. याबाबतही राज्य शासनाकडे तक्रार करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात ठाण मांडून बसलेल्या काही अधिकाºयांनी हा प्रकार केला असताना या प्रकाराकडे औरंगाबाद येथील उपसंचालक कार्यालयाकडून दुर्लक्ष करण्यात आले.आता राज्यस्तरावरुनच या प्रकाराची चौकशी सुरु करण्यात आल्याने अनियमितता केलेल्या अधिकाºयांमध्ये खळबळ उडाली आहे. शिवाय ज्या खाजगी शिक्षण संस्थामध्ये अशा प्रकारे भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे, त्या खाजगी शिक्षण संस्थाचालकांचेही ढाबे दणाणले आहेत. त्यामुळे या प्रकरणी शिक्षण विभागाने कडक भूमिका घेऊन शिक्षण विभागाला फसविणाºयांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिक्षण वर्तुळातून होत आहे.शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाºयांची संचमान्यता अंतिम करणे सुरु४राज्यातील ७५ हजार ३८ शाळांमध्ये विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांची आकडेवारी शिक्षण विभागाकडे उपलब्ध नाही. ३० सप्टेंबर २०१४ पर्यंत सर्व शाळांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी संख्येची माहिती विभागीय शिक्षण अधिकाºयांना दिली. मात्र शिक्षणाधिकाºयांनी काही शाळांचा अहवाल प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडे सादर केला नसल्याने २०१४-१५ ची संचमान्यता होऊ शकली नाही. डिसेंबर २०१५ मध्ये ही बाब निदर्शनास आली. ही माहिती सादर करण्यास विलंब करणाºया शिक्षणाधिकाºयांवरही शिक्षण विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांची संचमान्यता अंतिम करण्याची कारवाई सुरु असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :parabhaniपरभणीTeacherशिक्षकStudentविद्यार्थीGovernmentसरकार