शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : मकर संक्रांतीच्या सणावर महागाईचे मळभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 00:03 IST

तीळ आणि गुळाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनातील गोडवा वाढविणाऱ्या यावर्षीच्या संक्रांतीवर मात्र महागाईचे मळभ दिसत आहेत़ बुधवारी जिल्हाभरात मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जात असून, या पार्श्वभूमीवर मंगळवारी बाजारपेठेमध्ये पुजेच्या साहित्यासह संक्रांतीसाठी लागणाºया वाणाचे साहित्य महागल्याचे पहावयास मिळाले़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : तीळ आणि गुळाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनातील गोडवा वाढविणाऱ्या यावर्षीच्या संक्रांतीवर मात्र महागाईचे मळभ दिसत आहेत़ बुधवारी जिल्हाभरात मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जात असून, या पार्श्वभूमीवर मंगळवारी बाजारपेठेमध्ये पुजेच्या साहित्यासह संक्रांतीसाठी लागणाºया वाणाचे साहित्य महागल्याचे पहावयास मिळाले़पौष महिन्यामध्ये साजरा केला जाणारा मकर संक्रांती हा सण शेतीशी निगडीत असलेला सण आहे़ शेतामध्ये आलेल्या माळव्याची आणि धान्याचे वाण सुगड्यातून महिला एकमेकींना देवून हा सण साजरा करतात़ त्यामध्ये हरभरे, उस, बोर, गव्हाची ओंबी, तीळ, बिबव्याची फुले हे साहित्य सुगड्यात भरून देवाला अर्पण केले जाते़ मकरसंक्रांत हा महिलांचा सण असून, या सणासाठी लागणारे साहित्य परभणीच्याबाजारपेठेत दाखल झाले आहे. दोन दिवसांपासून येथील गांधी पार्क, क्रांती चौक, काळी कमान, देशमुख हॉटेल या भागात वाणासाठीचे साहित्य विक्रीसाठी आलेले आहे़ हळदी, कुंकू, रांगोळी याबरोबरच सुगडे, बिबव्याची फुले, वाळकं, हरभºयाचे टहाळ, ऊस कांडे, पेरू, करडईचे फुले आदी साहित्याची दोन दिवसांपासून विक्री होत असून, बाजारपेठ ग्राहकांनी फुलली आहे़ यावर्षी या बाजारपेठेवर महागाईचे सावट दिसून आले़शेत शिवारांमध्ये वाळकांची आवक कमी असल्याने वाळकांची विक्री ८० रुपये किलो प्रमाणे विक्री झाली़ त्याच प्रमाणे बिबव्याची फुले १० रुपयांना दोन, सुगडे ३५ रुपयांना ५, ऊसाचे कांडे ५ रुपयांना एक, ओंब्या ५ रुपयांना ५, बोरं ५ रुपयांना एक ग्लास, वाल्याच्या शेंगा, २५ रुपये भाव या दराने विक्री झाल्या आहेत़तीळ, गुळाचे दर स्थिर४संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तीळ आणि गुळाची मोठ्या प्रमाणात विक्री होते़ ही बाब लक्षात घेवून बाजारपेठेत तिळाची तसेच गुळाची आवक वाढली आहे़ तीळ १३० ते १४० रुपये किलो या दराने विक्री झाले़४तर गुळाची विक्री ४० ते ५० रुपये किलो दराने झाली़ मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी तीळ आणि गुळाचे दर स्थिर असल्याची माहिती विक्रेते राजू देशमुख यांनी दिली़ तीळामध्ये गावरान तीळ ११० ते १२० रुपये किलो या दरा प्रमाणे विक्री झाले़४तर गुजरातहून आलेल्या तीळाला मात्र १४० रुपयांचा दर मिळाला आहे़ गुळही तीन प्रकारे असून, गावरान गुळ ४० रुपये किलो, पॅकींगचा गुळ ४५ रुपये किलो तर सेंद्रीय गुळ ७० किलो प्रमाणे विक्री झाला़

टॅग्स :parabhaniपरभणीMakar Sankrantiमकर संक्रांतीMarketबाजार