शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

परभणी : उरुसातून १८ लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 23:42 IST

येथील हजरत सय्यद शाह तुराबूल हक यांच्या ऊरुसामध्ये जिल्हा वक्फ बोर्डाला १८ लाख ४ हजार रुपयांचे उत्पन्न झाले आहे. परभणी येथील ऊरुस राज्यभरात प्रसिद्ध आहे. दरवर्षी ३१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या काळात शहरामध्ये ऊरुस भरविला जातो. ऊरुसासाठी देशभरातील व्यापारी परभणीत येऊन व्यवसाय करतात. या व्यापाऱ्यांना जिल्हा वक्फ बोर्डाच्या माध्यमातून दुकाने उपलब्ध करुन दिली जातात.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील हजरत सय्यद शाह तुराबूल हक यांच्या ऊरुसामध्ये जिल्हा वक्फ बोर्डाला १८ लाख ४ हजार रुपयांचे उत्पन्न झाले आहे.परभणी येथील ऊरुस राज्यभरात प्रसिद्ध आहे. दरवर्षी ३१ जानेवारी ते १५ फेब्रुवारी या काळात शहरामध्ये ऊरुस भरविला जातो. ऊरुसासाठी देशभरातील व्यापारी परभणीत येऊन व्यवसाय करतात. या व्यापाऱ्यांना जिल्हा वक्फ बोर्डाच्या माध्यमातून दुकाने उपलब्ध करुन दिली जातात. राहट पाळणे, गेम शो, मनोरंजनाची साधने, छोटे व्यावसायिक यांच्याकडूनही वक्फ बोर्ड किरायापोटी रक्कम वसूल करते. यावर्षीच्या ऊरुसामध्ये ५८० दुकाने भाडेतत्वावर देण्यात आली होती. तसेच या दुकानांशिवाय रस्त्यांवर स्टॉल लावलेल्या लघु विक्रेत्यांकडूनही वक्फ बोर्डाने भाडे वसूल केले आहे. शोलाईनसाठी १५ ब्लॉक किरायाणे दिले होते. या सर्व बाबींमधून जिल्हा वक्फ बोर्डाला ३० लाख ३० हजार १९७ रुपये प्राप्त झाले. त्यातून मीना बाजाराची उभारणी करण्यासाठी १२ लाख ७४ हजार रुपये, ऊरुसाच्या प्रसिद्धीसाठी ३० हजार रुपये, संदल व इतर कार्यक्रमांसाठी २५ हजार रुपये, दर्गा आणि मशिदीचे थकलेले वीज बिल अदा करण्यासाठी २ लाख ७५ हजार रुपये असा १५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. खर्च वजा जाता जिल्हा वक्फ बोर्डाला १८ लाख ४ हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले असल्याची माहिती बोर्डाच्या वतीने देण्यात आली.दरम्यान, ऊरुस शांततेत पार पाडण्यासाठी वक्फ बोर्डाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजीज अहमद, जिल्हा वक्फ अधिकारी शेख जिलानी, खुसरो खान, नखी अली, आयुब खान, रियाज अहमद, अल्ताफ खान, जमीर खान यांच्यासह जिल्हा वक्फ बोर्डातील अधिकारी, कर्मचारी, महापालिका व जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.अनेक पटीने वाढले बोर्डाचे उत्पन्न४जिल्हा वक्फ बोर्डाला मागील वर्षी केवळ २ हजार रुपयांचे उत्पन्न ऊरुसातून मिळाले होते. यावर्षी ते १८ लाखापर्यंत पोहचले आहे. विशेष म्हणजे यावर्षी विद्युत कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराने मोफत सेवा दिली. त्यामुळे विद्युत सेवेवरील खर्चाची बचत झाली असून वक्फ बोर्डाच्या उत्पन्नात चांगलीच वाढ झाली आहे. या उत्पन्नातून दर्गामध्ये रंगरंगोटी करणे, दर्गा, मशिदीचे नियमित वीज बिल भरणे. तसेच वक्फ बोर्डातील अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च भागविला जाणार आहे.

टॅग्स :parabhaniपरभणी