शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

परभणी : कोरोनाबाबत प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष : दैनंदिन बाबींना दिले जातेय् महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 10:53 PM

जगातील जवळपास १५० देशांमध्ये कोरोना या संसर्गजन्य विषाणूने धुमाकूळ घालून सर्वांची झोड उडविली असताना परभणी जिल्ह्यात मात्र बेजबाबदार नागरिक दक्षता बाळगण्याऐवजी दैनंदिन बाबींनाच महत्त्व देत असल्याचे दिसून येत आहे़

परभणी : कोरोनाबाबत प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष : दैनंदिन बाबींना दिले जातेय् महत्त्वनिष्काळजीपणा सोडा; जबाबदार नागरिक बनालोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जगातील जवळपास १५० देशांमध्ये कोरोना या संसर्गजन्य विषाणूने धुमाकूळ घालून सर्वांची झोड उडविली असताना परभणी जिल्ह्यात मात्र बेजबाबदार नागरिक दक्षता बाळगण्याऐवजी दैनंदिन बाबींनाच महत्त्व देत असल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी आठवडी बाजार बंद करण्याचे आदेश दिले असतानाही बाजार भरत आहेत़ अत्यावश्यक कामांसाठीच दुकानांमध्ये जा असे सांगूनही त्याचे पालन होत नाही़ सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, असा आदेश काढूनही त्याकडे कानाडोळाच केला जात असल्याची बाब शुक्रवारी केलेल्या पाहणीत आढळून आली़कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे आतापर्यंत राज्यातील २ जणांचा मृत्यू झाला असून, ५२ जणांना लागण झाली आहे़ परभणी जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह एकही रुग्ण आढळला नसला तरी ४० संशयितांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली आहे़ या संसर्गजन्य आजाराचा फैलाव होवू नये, यासाठी एकीकडे प्रशाकीय व वैद्यकीय अधिकारी जिवाचे रान करीत आहेत़ त्यांच्या प्रयत्नांना अनेक नागरिक प्रामाणिकपणे साथ देत असले तरी काही बेजबाबदार नागरिकांकडून कमालीचा निष्काळजीपणा बाळगला जात असल्याचे पहावयास मिळत आहे़जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यात कोठेही आठवडी बाजार भरविण्यात येऊ नयेत, असे आदेश काढले आहेत़ तरीही जिंतूर तालुक्यातील कौसडी, पाथरी तालुक्यातील लिंबा येथील आठवडी बाजार शुक्रवारी भरला़ गेल्या आठवड्यातही परभणी, सेलू, गंगाखेड, झरी येथेही बाजार भरले होते़ थुंकीतून विषाणूचा प्रसार होवू शकतो, या दृष्टीकोणातून जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व पानटपºया बंद ठेवण्याचे आदेश गुरुवारी काढले होते़ तरीही गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पानटपºया सुरू होत्या़ विशेष म्हणजे मुख्य रस्त्यावरील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरीलच पानपट्टीवर रात्री १०़३० च्या सुमारास गर्दी दिसून आली़ शुक्रवारी सकाळीही शहरातील अनेक भागांत पानपट्ट्या सुरू होत्या़ दुपारी १२ नंतर शहरात प्रमुख मार्गावर पोलिसांच्या गाड्या फिरल्या़ काही पानपट्टी चालकांना पोलिसांनी धारेवर धरले़ १२१ जणांवर कारवाई करून २३ हजार ६५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला़ त्यामुळे दुपारनंतर या पानपट्ट्या कडकडीत बंद झाल्या़ दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयासह अन्य शासकीय कार्यालयांमध्ये गर्दी टाळण्याच्या दृष्टीकोणातून ५० टक्केच कर्मचाºयांना एकीकडे बोलविले जात असताना दुसरीकडे या कार्यालयांमध्ये कामासाठी येणाºयांची गर्दी मात्र दिसून येत आहे़ शहरातील प्रशासकीय इमारतीतील रजिस्ट्री कार्यालयात दुपारी ४ ते सायंकाळी ५़३० च्या दरम्यान, चांगलीच गर्दी होती़ जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील झेरॉक्स, हॉटेल्स व अन्य दुकानांमध्येही गर्दी पहावयास मिळाली़ तसेच शहरातील शिवाजी चौक, गुजरी बाजार, जनता मार्केट, जुना मोंढा आदी भागांमध्ये नागरिक गुढीपाडव्यानिमित्त खरेदी करण्यासाठी आल्याचे पहावयास मिळाले़ जनता मार्केट भागात तर वाहतुकीची कोंडी पहावयास मिळाली़ त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी एकीकडे गर्दी जमवू नका, आवश्यक असेल तरच बाहेर पडा, असे आदेश देवूनही त्याचा परिणाम या नागरिकांवर दिसून आला नाही़ स्टेशन रोड, वसमत रोड, जिंतूर रोड आदी भागात चहाच्या टपरीवरही सातत्याने गर्दी दिसून येत होती़ त्यामुळे संपूर्ण समाजाला संकटात ओढावणाºया अशा बेजबाबदार व्यक्तींवरच कारवाई करण्याची गरज आहे़मानवतमध्ये दुपारपर्यंत टपºया सुरूच४मानवत : कोरोना या संसर्गजन्य आजाराचा फैलाव होवू नये, म्हणून जिल्हाधिकाºयांनी ३१ मार्चपर्यंत जिल्ह्यातील सर्व पानटपºया बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत़; परंतु, मानवत शहरातील पानटपºया शुक्रवारी दुपारी २ वाजेपर्यंत सुरूच होत्या़ त्यामध्ये रेल्वे स्टेशन रोडवरील ३, बसस्थानक परिसरातील ३, अपना कॉर्नर परिसरातील ६, ग्रँड कॉर्नर परिसरातील २ टपºया सुरू होत्या़ दुपारी २ च्या सुमारास पोलिसांनी याबाबत सूचना दिल्यानंतर पानटपºया बंद करण्यात आल्या़ एका महाभागाने पोलीस गाडी पुढे निघून गेल्यानंतर पुन्हा पानटपरी उघडून व्यवहार सुरू केला असल्याचे पहावयास मिळाले़ स्टेशन रोड परिसरातील पानटपºया सकाळी ९ वाजेपासून सुरू होत्या.विवाह सोहळे सुरूच जिल्हाधिकाºयांनी मंगल कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश दिले असताना गुरुवारी परभणीत काही मंगल कार्यालयांमध्ये विवाह सोहळे झाले़ गंगाखेडमध्ये याच कारणावरून दोन मंगल कार्यालये मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़शासकीय कार्यालयाच्या भिंती रंगविणे सुरूच४मावा, पान, गुटखा आदी तंबाखूजन्य व अन्य पदार्थ खावून सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, यासाठी जिल्हाधिकाºयांनी पानटपºया बंद करण्याचे आदेश काढले असले तरी कोठून तरी हे साहित्य मिळून तल्लफ भागविणारे शासकीय कर्मचारीही शुक्रवारी पहावयास मिळाले़ प्रशासकीय इमारतीतील जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या प्रवेशद्वाराजवळच या परिसरातील कर्मचाºयांनी मनसोक्तपणे गुटखा, पान, मावा खावून थुंकल्याचे दिसून आले़ महानगरपालिकेतही हीच स्थिती होती़ त्यामुळे अशा कर्मचाºयांवर कडक कारवाईच्या दृष्टीकोणातून निर्णय घेणे आवश्यक आहे़आबुधाबी, अमेरिका रिटर्न चौघांचे स्वॅब घेतलेलोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आबुधाबी या देशातून आलेल्या परभणीतील ३ व अमेरिकेतून आलेल्या गंगाखेडमधील १ अशा चार जणांचे स्वॅब शुक्रवारी आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात आले असून, ते तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली़जिल्ह्यात आतापर्यंत ४४ संशयितांची कोरोनाच्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली आहे़ त्यामधील ३१ जणांच्या लाळेचे (स्वॅब) नमुने आरोग्य यंत्रणेने घेतले असून, ते पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले़ त्यापैकी १६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे़ ८ जणांचे स्वॅब नाकारण्यात आले असून, ७ जणांचा अहवाल येणे बाकी आहे़ शुक्रवारी परभणी येथील ३ जण आबुधाबी या देशातून परतले़ त्यांचे जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वॅब घेण्यात आले तर गंगाखेड येथील एक अमेरिकेतून परतला़ या नागरिकाचाही स्वॅब घेवून तो प्रयोगशाळेत पाठविण्यात आला़ आतापर्यंत ३२ जणांना कोरोंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे़ कोरोना विषाणूच्या अनुषंगाने जिल्ह्यात प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत असून, यासाठी जनजागृती शिबीर घेण्यात येत आहे़ मानवत येथे २० मार्च रोजी सकाळी ११ वाजता या संदर्भात तहसीलदार दौलतराव फुपाटे यांनी बैठक घेतली़ यावेळी नायब तहसीलदार नकूल वाघुंडे, डॉ़ रेहान शेख, डॉ़ नरेंद्र वर्मा, ठाकूर, जाधव, गटशिक्षणाधिकारी संजय ससाने, रणमाळे आदींची उपस्थिती होती़काळाबाजार रोखण्यासाठी पथक४मास्क व सॅनिटायझर या दोन वस्तुंचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश करण्यात आला आहे़ त्यामुळे त्यांचा काळाबाजार रोखण्याच्या दृष्टीकोणातून कारवाई करण्याच्या अनुषंगाने शहर व जिल्ह्यात ५ अधिकाºयांचे पथक स्थापन करण्यात आले आहे़ त्यामध्ये जिल्हा पुरवठा निरीक्षण अधिकारी विवेक पाटील हे पथकाचे प्रमुख असून, तालुका पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रशांत सुपेकर, पुरवठा निरीक्षक सुरश्री मुदगलकर, वैधमापन शास्त्र निरीक्षक एस़एम़ बिल्पे, अन्न व औषधी प्रशासन सहाय्यक आयुक्त एम़ आऱ सरकटे हे सदस्य आहेत़२ दिवस जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद राहणार४कोरोना विषाणूचा संसर्ग होवू नये, या दृष्टीकोणातून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी २१ व २२ मार्च रोजी शाकसीय, निमशासकीय कार्यालये, पाणीपुरवठा करण्याचे व्यवस्थापन, सर्व बँका, दूरध्वनी, इंटरनेट सेवा पुरविणाºया आस्थापना, रस्ते, वाहतूक व रेल्वे व्यवस्था, अन्न, भाजीपाला व किराणा पुरविणाºया आस्थापना, दवाखाने, औषधी दुकान, विद्युत पुरवठा, पेट्रोलियम, उर्जा संसाधने, प्रसार माध्यमे व अत्यावश्यक सेवा देणाºया आयटी आस्थापना वगळून सर्व आस्थापना व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत़४या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जि़प़ सीईओ, पोलीस अधीक्षक, मनपा आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, सर्व नगरपालिका आदींवर सोपविण्यात आली आहे़ आदेशाचे पालन न करणाºयांवर कारवाई करण्यात येणार आहे़ दरम्यान,जिल्हाधिकाºयांच्या या आदेशाचे पालन करून दोन दिवस जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांत हाके यांनी दिली़

टॅग्स :parabhaniपरभणीcorona virusकोरोना वायरस बातम्याGovernmentसरकार