शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

परभणी: शेकडो ट्रॅक्टरने रात्रंदिवस वाळूउपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:50 IST

तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून शेकडो ट्रॅक्टरांच्या साह्याने रात्रं-दिवस वाळूचा बेसुमार अवैध उपसा सुरूच असल्याने वाळू चोरीला लगाम लावण्यात महसूल प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड (परभणी) : तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून शेकडो ट्रॅक्टरांच्या साह्याने रात्रं-दिवस वाळूचा बेसुमार अवैध उपसा सुरूच असल्याने वाळू चोरीला लगाम लावण्यात महसूल प्रशासन अपयशी ठरल्याचे दिसत आहे.तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीपात्रात अधिकृतरित्या असलेल्या वाळुच्या धक्याचा लिलाव झाला नाही. त्यामुळे वाळूमाफियांनी गोदावरी पात्रात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. दररोज शेकडो ट्रॅक्टरच्या माध्यमातून गंगाखेड तालुक्यातील मैराळ सावंगी, चिंचटाकळी, गोंडगाव, खळी परिसर, महातपुरी, मुळी बंधारा परिसर, धारखेड, गंगाखेड शहर, रेल्वे पूल परिसर, झोला पिंपरी, मसला आदी ठिकाणाहून रात्रंदिवस वाळुचा उपसा सुरूच ठेवल्याने गोदावरी नदीपात्र वाळवंट झाल्याचे चित्र दिसून येत आहे.ट्रॅक्टरद्वारे वाळूचा उपसा करून नदी पात्राजवळ मोठ-मोठे वाळू साठे तयार करण्यात आले आहेत. महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नजर चूकवित हायवा, टिप्पर आदी वाहनांद्वारे वाळू साठ्यांमधील वाळू बाहेरील जिल्ह्यात वाहतूक केली जात आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने महसूलचे कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असताना वाळूमाफिया मात्र वाळू दिसेल त्या ठिकाणावरून चोरून नेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.तालुक्यातील धारखेड शिवारातील सर्व्हे नंबर १८३, १८४, १८५ मधील शेत शिवाराजवळून झोला येथील वाळूमाफिया ट्रॅक्टरद्वारे रात्रंदिवस वाळूचा बेसुमार उपसा करीत आहेत. यामुळे गोदाकाठी असलेल्या शेतीला धोका निर्माण झाला आहे. तलाठी, सरपंच व पोलीस पाटील यांच्यासह शेतकºयांनीही वाळू माफियांना आवर घालण्याची मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. तसेच सय्यद समीर सय्यद सलीम या शेतकºयानेही जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्याकडे लेखी तक्रार करून गोदावरी नदी परिसरातील वाळुची चोरी थांबवावी, अशी मागणी केली आहे.एका वाळू : धक्क्याचा लिलाव झाल्याची माहिती४गंगाखेड तालुक्यातील चिंचटाकळी व दुस्सलगाव येथील दोन वाळू धक्यांची लिलाव प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने हाती घेतली होती. २१ फेब्रुवारीपासून ते १४ मार्चपर्यंत राबविण्यात आलेल्या या लिलाव प्रक्रियेत चिंचटाकळी येथील वाळू धक्का ६१ लाख ११०० रुपयांची बोली मिळाल्याने या धक्याचा लिलाव झाल्याची माहिती आहे. याबाबत तहसील कार्यालयातील संबंधित विभागाशी संपर्क साधला असता १६ मार्च रोजीपर्यंत वाळू धक्क्याचा लिलाव झाल्याची अधिकृत माहिती तहसील प्रशासनास मिळाली नसल्याचे सांगण्यात आले.हजारो ब्रास वाळूची चोरी४गंगाखेड तालुक्यातील १३ वाळू धक्क्यांपैकी सद्य स्थितीत एकाही वाळू धक्क्याचा लिलाव झाला नाही. यामुळे परिसरातील वाळू माफियांनी हजारो ब्रास वाळूची चोरी केल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. तालुक्यातील वाळू धक्क्यांचा लिलाव तत्काळ करून वाळू चोरी थांबविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी तालुकावासियांतून होत आहे.

टॅग्स :parabhaniपरभणीsandवाळूriverनदी