परभणी : आता घरपट्टी भरता येणार आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 12:05 AM2019-11-10T00:05:17+5:302019-11-10T00:06:04+5:30

शहरातील मालमत्ताधारकांकडे घरपट्टी आणि पाणीपट्टी घरबसल्या भरण्याची सुविधा महानगरपालिका लवकरच उपलब्ध करुन देणार आहे. या धर्तीवर मनपाने प्रयत्न सुरु केले असून येत्या काही दिवसांत आॅनलाईन सुविधा कार्यान्वित केली जाणार आहे.

Parbhani: Home page can now be filled online | परभणी : आता घरपट्टी भरता येणार आॅनलाईन

परभणी : आता घरपट्टी भरता येणार आॅनलाईन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील मालमत्ताधारकांकडे घरपट्टी आणि पाणीपट्टी घरबसल्या भरण्याची सुविधा महानगरपालिका लवकरच उपलब्ध करुन देणार आहे. या धर्तीवर मनपाने प्रयत्न सुरु केले असून येत्या काही दिवसांत आॅनलाईन सुविधा कार्यान्वित केली जाणार आहे.
परभणी शहरामध्ये सुमारे ७० हजार मालमत्ता आहेत. या मालमत्ताधारकांकडून घरपट्टी आणि पाणीपट्टी कराच्या स्वरुपात वसूल केली जाते. मात्र मागील काही वर्षांपासून घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीला थंड प्रतिसाद मिळत आहे. ही वसुली वाढावी. तसेच शहरातील नागरिकांची गैरसोय दूर व्हावी, या उद्देशाने मनपाने आॅनलाईन कर वसुली कार्यप्रणाली सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत मालमत्ताधारकांना घरबसल्या त्यांचा कर किती, याची माहिती मिळणार असून आॅनलाईन कर भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
या सुविधेची माहिती देण्यासाठी ८ नोव्हेंबर रोजी बी.रघुनाथ सभागृहात कर निरीक्षक आणि वसुली लिपिकांची कार्यशाळा पार पडली.
आयुक्त रमेश पवार यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी मुख्यलेखाधिकारी गणपत जाधव, सहाय्यक आयुक्त अलकेश देशमुख, संगणकप्रमुख आदनान कादरी, नगरसचिव विकास रत्नपारखे, आॅनलाईन सुविधेसाठी नेमलेल्या सल्लागार एजन्सीचे अमोल डोईफोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कर निरीक्षक व वसुली लिपिकांनी त्यांच्याकडील वसुली वार्डची अद्ययावत माहिती, ज्यामध्ये मालमत्तांची संख्या, थकबाकीचा कालावधी, थकबाकी मागणी, चालू मागणी, एकूण मागणी आदी माहिती येत्या तीन दिवसांत सादर करावी, अशा सूचना आयुक्त रमेश पवार यांनी दिल्या आहेत.
ही सर्व माहिती आॅनलाईन सॉफ्टवेअरमध्ये नोंदविणे, त्याची प्रिंट काढून ती अचूक आहे का? याची खात्री करुन प्रमाणपत्र सादर करण्याचे निर्देशही पवार यांनी कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
कर्मचाºयांना दिले प्रशिक्षण
मालमत्ताकराची आॅनलाईन वसुली प्रणाली कशी आहे, तिचा वापर कसा करावा, याबाबतची प्रात्याक्षिकासह माहिती या कार्यशाळेत देण्यात आली. कर निरीक्षक व वसुली लिपिकांच्या शंकाचे निरसणही करण्यात आले. याशिवाय या आॅनलाईन प्रणालीबाबत सर्व लिपिक आणि कर निरीक्षकांना वैयक्तिक प्रशिक्षण दिले जाणार असून वसुलीसाठी लवकरच ३५ वसुली लिपिकांना मोबाईल टॅब दिले जाणार आहेत.

Web Title: Parbhani: Home page can now be filled online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.