शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : पीककर्जावरून आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 01:04 IST

शेतकऱ्यांची अडवणूक थांबवून येत्या आठवडाभरात पीक कर्जाचे वाटप करावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी अलाहाबाद बँकेच्या व्यवस्थापकांना दिला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : शेतकऱ्यांची अडवणूक थांबवून येत्या आठवडाभरात पीक कर्जाचे वाटप करावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी अलाहाबाद बँकेच्या व्यवस्थापकांना दिला आहे़अलाहाबाद बँकेतून पीक कर्ज दिले जात नसल्याच्या तक्रारी शेतकºयांनी आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्याकडे केल्या होत्या.या तक्रारींची दखल घेत २३ जून रोजी आ़ डॉ़ पाटील यांनी जिंतूर रोडवरील अलाहाबाद बँकेत जाऊन अधिकाºयांना जाब विचारला. शेतकºयांना पीक कर्जाची आवश्यकता असतानाही नियमावर बोट ठेवत बँकेने आतापर्यंत केवळ ५ टक्के शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप केले आहे़ शेतकरी कर्जासाठी चकरा मारीत असताना बँकेचे अधिकारी मात्र दाद देत नसल्याच्या कारणावरून आ़ डॉ़ पाटील यांनी संताप व्यक्त केला. येत्या आठ दिवसांमध्ये सर्व शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करावे, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करून बँक प्रशासनाला शेतकºयांना पीक कर्ज देण्यास भाग पाडू, असा सज्जड इशाराही यावेळी आ़ डॉ़ पाटील यांनी दिला़ यावेळी संदीप झाडे, महेश इंगळे, नाथराव लोंढे, गजानन लोंढे, परमेश्वर यादव, सुरेश जाधव, सरपंच प्रभाकर जैस्वाल, माधव काकडे आदी उपस्थित होते़पीककर्ज : अडवणूक करू नकायावेळी बँक अधिकाºयांशी चर्चा केल्यानंतर आ.डॉ. राहुल पाटील म्हणाले की, गतवर्षी शेतकºयांना समाधानकारक पीक विमा मिळाला नाही. त्यामुळे अगोदरच शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे यावर्षी शेतकºयांची पीक कर्जासाठी अडवणूक करू नका. शेतकरी सहनशील आहेत; परंतु, त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. अन्यथा शेतकºयांच्या संतापाला सामोरे जावे लागेल. शिवसेना शेतकºयांच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे. याची जाणीव बँकेला असू द्या, असेही यावेळी आ. पाटील म्हणाले.

टॅग्स :parabhaniपरभणीbankबँकFarmerशेतकरीagitationआंदोलन